Sanjay Raut – हे विधिमंडळ नाही, चोरमंडळ आहे; संजय राऊत यांची शिंदे गटावर टीका

Sanjay Raut । संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चोरमंडळ म्हटलं आहे. तसेच किरीट सोमय्यांविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावरून सभागृहात गदारोळ सुरु आहे. सभागृहाचे कामकाज हे १० मिनिटासाठी नंतर २० मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.

काय म्हणाले संजय राऊत ( Sanjay Raut Controversial Statement )

ही बनावट शिवसेना आहे. ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नाही. हे चोरमंडळ आहे.  आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक पदे दिली आहेत. आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीत. पदे गेली पदं परत येतील. आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

शिवसेना खासदार संजय राऊत अडचणीत येण्याची शक्यता ( Sanjay Raut Controversial Statement Act Of Violation Of Rights In The Legislative Hall )

‘महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ’ असं संजय राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार आक्रमक झाले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत अडचणीत येण्याची शक्यता आहे. राऊतांविरोधात राज्य सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संजय राऊतांवर विधिमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची तयारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राऊतांना वादग्रस्त विधान वरून अडचणीत येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.