Job Opportunity | जॉब अलर्ट! मुंबई महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) परिचारिका (Staff Nurse) पदाच्या एकूण 652 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 21 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवाराला पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता (Address to submit application)

वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई – 400011.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.portal.mcgm.gov.in/

महत्वाच्या बातम्या