हे सरकार फक्त अटी टाकून कामं रखडवण्यात आघाडीवर; अजित पवारांची सरकारवर टीका

Ajit pawar at shrigonda

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. या दुष्काळाचा दौरा सगळेच नेते करत आहेत. राज्य सरकारही दुष्काळ निवारणासाठी प्रयत्नशील आहे. दुष्काळ दौरा केल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे.

पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी राज्यातील शिवसेना-भाजप युतीच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘हे सरकार कोणतेही काम असेल तर ते करत नाहीत. केवळ अटी टाकून ते काम कसे रखडले जाईल, असेच धोरण अवलंबते आहे. हे सरकार अटींचे सरकार आहे. आरक्षणाला अट, चारा छावणीला अट, प्रवेशाला अट यातून कोणाचंही भलं होणार नाही’ अशा शब्दात सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता त्यावर टीका करताना पवार यांनी ‘फक्त व्हिडीओ कॉन्फरसिंग करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर उतरावे लागेल. मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी मंत्री फिल्डवर जायला घाबरतात. कारण अधिकारी त्याचं ऐकत नाहीत’ अशा शब्दात सरकारवर टीका केली आहे.Loading…
Loading...