Sanjay Raut | संजय राऊतांच्या ‘चोर’मंडळ शब्दावरुन भाजप, शिवसेनेची हक्कभंगाची मागणी

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चोरमंडळ म्हटलं आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी गदारोळ सुरु आहे. तसेच किरीट सोमय्यांविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सभागृहाचे कामकाज हे 10 मिनिटासाठी नंतर 20 मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.

Sanjay Raut Controversial Statement

विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांनी शिवसेना गट आणि भाजपवर (BJP) निशाणा साधताना केलं आहे. पण राऊतांच्या याच वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. संजय राऊतांवर विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी केली आहे.

हा महाराष्ट्रद्रोह…; आशिष शेलारांची राऊतांवर टीका

“संजय राऊत यांचं नैराश्य समजू शकतो. एक हिंदी सिनेमाचं गाणं आहे, चोरों को सभी नजर आते है चोर, हा विधानसभेचा, सगळ्या सदस्यांचा अपमान. हा महाराष्ट्रद्रोह आहे,” अशा शब्दात आशिष शेलारांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

“हक्कभंग दाखल करणार”

“संजय राऊत हे भरकटले आहेत. राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे डिक्शनरीतून रोज नवा शब्द शोधून काढून बोलत आहेत. त्यांच्या तोंडाला करवंदीचा काटा लावला पाहिजे. आता आम्ही त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करतोय”, असं भरत गोगावले म्हणाले आहेत.

‘संजय राऊत यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमान होत आहे. हा केवळ महाराष्ट्राचा अपमान नाही. हा महाराष्ट्र द्रोह आहे. महाराष्ट्राबाबत ही भावना असेल तर ठाकरे गटाच्या आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. या सभागृहात दाऊद आहे का? या सभागृहात बसलेल्यांना चोर म्हणताय. तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

अतुल भातखळकरांची प्रतिक्रिया (Atul Bhatkhalkar reaction)

“राऊत यांनी जो विधिमंडळाचा अपमान केला त्याबाबत मी हक्कभंगाची सूचना दिली आहे. त्यांनी विधिमंडळ नव्हे चोरमंडळ आहे. त्यांनी सरळ म्हटलं आहे. त्यांनी गुंड मंडळ म्हटलं. या विधिमंडळाला उज्ज्वल परंपरा आहे. यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपासूनची उज्जवल परंपरा आहे. तरीही तुम्ही चोरमंडळ म्हणता. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आपण आजच्या आज हे प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवा. त्यावर तातडीने सुनावणी करा आणि बोलणाऱ्यांना शिक्षा करा”, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

सभागृहात नेमका काय प्रकार घडला?

संजय राऊत यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. भाजप आमदार आशिष शेलार यांना राऊत यांच्या या विधानाकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. ‘संजय राऊत यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमान होत आहे. हा केवळ महाराष्ट्राचा अपमान नाही. हा महाराष्ट्र द्रोह आहे. महाराष्ट्राबाबत ही भावना असेल तर ठाकरे गटाच्या आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. या सभागृहात दाऊद आहे का? या सभागृहात बसलेल्यांना चोर म्हणताय. तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. बोटचेपी भूमिका घेऊ नका. विधिमंडळाच्या अपमानाबाबत अशी भूमिका घेऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –