Nitesh Rane | अजित दादाला सर्व माफ; ते करमुक्त – नितेश राणे

Nitesh Rane | मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कालच्या ( 1मे ) महाविकास आघाडीची वज्रमूठ सभेदरम्यान केंद्रातल्या मोदी सरकारपासून ते राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारपर्यंत सगळ्यांना धारेवर धरलं चांगलाच समाचार घेतला आहे. तसचं त्यांनी नाव न घेता नितेश राणेंनाही टोला लगावला. तर आता नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला आहे.

अजित दादांना सगळंच माफ : नितेश राणे (Everything is forgiven to Ajit Dada: Nitesh Rane)

गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांबाबत वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्याबद्दल बोलताना अजित पवार यांनी नाव न घेता नितेश राणेंना टोला लगावत म्हटलं होत की, राज्यात आलिकडच्या काळात वाचाळविरांची संख्या वाढली आहे. टिल्ली टिल्ली लोकं सुद्धा काहीपण बोलायला लागली आहेत. आपण काय बोलतोय काय नाही… यांचे अनेक शब्द मीडियाला दाखवताही येत नाही. अशा प्रकारचा सत्ताधारी पक्षाचा कारभार चालला आहे. असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर आता नितेश राणे यांनी उत्तर देत म्हटलं की, अजित दादांना सगळंच माफ आहे. ते करमुक्त आहेत. म्हणून त्यांच्यावर मी काही टीका करणार नाही. लवकरच कळेल मी असं का म्हणालो. जो कोणकणातील प्रकल्प सुरू होणार आहे त्याला स्थानिक आणि काही नेत्यांचा विरोध होत आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांची भूमिका मात्र स्पष्ट आहे. त्यानचा या प्रकरणाला विरोध नाही. तसचं येणाऱ्या काळात कळेल अजित पवारांनी सगळं माफ का आहे. समजने वालो को इशारा काफी हें. असं देखील राणे म्हणाले. लवकरच हा चित्रपट रिलीज होईल मग तुम्हाला कळेल माझ्या हिशोबाने ते करमुक्त का आहेत. अस अजित पावरांबाबत नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर देखील हल्लाबोल करत संजय राऊतांचा समाचार घेत म्हटलं की, “उद्धवजींना मी सांगेन तुमच्यावर बोललं तर तुम्हाला झोंबतं, पण तुमच्या सकाळच्या भोंग्याचं काय?” हा माणूस (संजय राऊत) काही वर्षांपासून रोज सकाळी आमच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका करतो ते तुम्हाला इतक्या वर्षात दिसलं नाही का? ही माझी केवळ पाचवीच पत्रकार परिषद आहे. त्या संजय राऊत ला सांगा खोटे आरोप आमच्या नेत्यावर करायचे नाहीत. नाहीतर जर आजून जर पत्रकार परिषद मी घेतल्या तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल. काल जो उध्दवजींनी आदनींनवर चरित्र लिहलं पाहिजे असा उल्लेख केला परंतु त्यांच्यावर चरित्र लिहण्यापेक्षा तरुण- तरुणींसाठी तुम्ही एक चरित्र लिहा. कुठला ही व्यवसाय न करता, कुठल्याही ऑफिसचा पत्ता नसताना तुमच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून? कुठला धंदा करता असा सवाल देखील राणेंनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.