PM Kisan Yojana | दुसऱ्याची शेतजमीन कसतं असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार का पीएम किसान योजनेचा फायदा? जाणून घ्या

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेचे 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. शेतकरी आता या योजनेतील 14 व्या हप्त्याची वाट बघत आहे. या योजनेतील चौदाव्या हप्त्याबाबत सरकारकडून सतत अपडेट दिले जात आहे. त्याचबरोबर अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेतील निधी पाठवला जाणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. कारण या योजतील रक्कम मिळवण्यासाठी काही शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्रांची मदत घेतली होती. त्यानंतर या योजनेमध्ये केंद्र सरकारकडून काही कडक नियम जारी करण्यात आले आहे.

भारतामध्ये बहुतांश शेतकरी दुसऱ्यांची शेतजमीन कसतात. मात्र, या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. ज्या शेतकऱ्याच्या नावावर शेती आहे, तेच शेतकरी या योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ घेऊ शकतात. जर जमीन तुमच्या नावावर नसेल, तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जमिनीची नोंद तुमच्या नावावर असणे खूप आवश्यक आहे.

या योजनेतील (PM Kisan Yojana) चौदावा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी आणि कागदपत्रांची पडताळणी करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. या गोष्टी पूर्ण नसल्यास शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे. त्याचबरोबर ही रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड पडताळणी करून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही कामे उरकून घ्यावी, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे.

PM किसान योजना हेल्पलाईन (PM Kisan Yojana Helpline)

पीएम किसान योजनेमध्ये (PM Kisan Yojana) तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी येत असेल, तर तुम्ही सरकारची मदत घेऊ शकतात. यासाठी तुम्ही या pmkisan-ict@gov.in ईमेल आयडीवर तुमची अडचण नोंदवू शकतात. किंवा या 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकतात.

महत्वाच्या बातम्या