Weather Update | राज्यासह ‘या’ ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे, तर कुठे उन्हाची तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली आहे. या बदलत्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या वातावरणामुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाकडून … Read more

Published On: 

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे, तर कुठे उन्हाची तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली आहे. या बदलत्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या वातावरणामुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाकडून काही भागांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), राज्यामध्ये पुढचे तीन दिवस उखाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर आज (2 मे) संपूर्ण देशामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. येत्या 15 दिवसांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून आराम मिळणार आहे.

राज्यासह चंदिगड, दिल्ली, ओडीसा, हरियाणा, झारखंड, तामिळनाडू, पंजाब, कर्नाटक, बिहार, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता (Weather Update) हवामान वर्तवण्यात आली आहे. तर राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

राज्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये आज गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा (Weather Update) हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही