Aditya Thackeray | “इथे जात, धर्म, प्रांताचे मतभेद नाहीत. सर्व संविधानाचे रक्षक आहेत” : आदित्य ठाकरे

Aditya Thackeray | मुंबई : बीकेसी मैदानात आज ( 1मे) ला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेला मविआचे अनेक नेते उपस्थित आहेत. अजित पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अस्लम शेख, सुनील प्रभू, सुषमा अंधारे, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित आहेत. तर आदित्य ठाकरे( Aditya Thackeray ) यांनी आपल्या भाषणातुन शिंदे आणि फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

इथे जात, धर्म, प्रांताचे मतभेद नाहीत. सर्व संविधानाचे रक्षक आहेत: आदित्य ठाकरे ( There are no caste, religion, region differences here. All are guardians of the Constitution: Aditya Thackeray )

आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधत म्हटलं की, आमच्याकडे खुर्च्या मोकळ्या राहत नाही, ही गद्दारांची सभा नाही म्हणून तर लोकं अजून येत आहेत. याचप्रमाणे इथे जात, धर्म, प्रांताचे मतभेद नाहीत. सर्व संविधानाचे रक्षक आहेत आणि आजचा हा दिवस सर्वांसाठी महत्वाचा आहे. कारण ही सभा महाराष्ट्राची राजधानी मुंबईत होत आहे ते पण 1मेच्या दिवशी. सध्या आपला हा महाराष्ट्रात अंधारात चालला आहे त्याला मविआ एकजुटीने बाहेर काढायचं काम करणार आहे. याचप्रमाणे कोरोना काळात अर्थचक्र बंद पडलं होतं तेव्हा साडेसहा कोटींची गुंतवणूक राज्यात आणली होती. तेव्हा कुणावरही अन्याय झाला नाही. काळजी घेऊन काम केलं होतं. परंतु जेव्हापासून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घटनाबाह्य सरकार आलं आहे. तेव्हा पासून फक्त भ्रष्टाचार सुरू आहे म्हणून हे सरकार कोसळल पाहिजे. तसचं आदित्य ठाकरे यांनी महिलांच्या रक्षणासंबंधित देखील भाष्य केलं.सुप्रिया ताईंना शिवी देणारा मंत्री अजूनही मंत्रिमंडळात आहेत. मग या लोकांवर कारवाई होत नसेल तर बाकीच्या महिलांना काय करावं?असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असताना देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आजून उपाय काढला जात नाही. त्याचा आवाज या सरकारपर्यंत पोहचत नाही. परंतु जेव्हा मविआ काळात कर्जमुक्ती झाली ती मिळाली की नाही? हे मी शेतकऱ्यांना विचारतो तेव्हा ते मिळाली असं सांगतात. याचप्रमाणे जी काही सरकारं आम्ही पाहिलं होतं कधी मुंबईला झुकवण्याचं काम पाहिलं नव्हतं, या सरकारला मुंबईला महाराष्ट्रापासून मोडायचं आहे, दिल्लीसमोर झुकवायचं आहे. पण मी ते होऊ देणार नाही. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही.असं आदित्य ठाकरे म्हणाले.

तसचं सभेदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी देखील जोरदार शब्दात सरकारवर हल्लाबोल केला. आव्हाड म्हणाले की, लोकशाहीमध्ये लोकांचं मन जिंकायाचं असतं, धडपशाही नसते. तसचं खारघरच्या सभेत काय झालं? ज्यांचा जीव गेलं त्यांच्या घरी कोणी मंत्री गेला नाही. जर कोकणाचा स्वास्थ्य बिघडत असेल, स्थानिकांच्या विरोध असेल तर आम्ही त्यांच्यासोबत असणार. आम्ही प्रकल्पाच्या विरोधात नाही, प्रकल्प बाहेर जावू नये असं मला ही वाटतो. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र राहिलं तर कोणाचा बापही आम्हाला हरवू शकत नाही. असं आव्हाड म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.