Dry Skin | कोरड्या त्वचेच्या समस्येवर मात करण्यासाठी दुधाच्या मलाईच्या ‘या’ पद्धतीने करा वापर

Dry Skin | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी (Skin care) अधिक घ्यावी लागते. या गरम वातावरणामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यामध्ये कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होते. या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र या उत्पादनांचा वापर करणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे कोरड्या त्वचेच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही दुधाच्या मलाईचा वापर करू शकतात. याचा वापर केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. उन्हाळ्यामध्ये कोरड्या त्वचेच्या समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने दुधाच्या मलाईचा वापर करू शकतात.

गुलाब जल आणि मलाई (Rose water and cream-Dry Skin)

उन्हाळ्यामध्ये कोरड्या त्वचेची समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही गुलाब जल आणि दुधाच्या मलाईचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा गुलाब जलमध्ये एक चमचा मलाई मिसळून घ्यावी लागेल. या मिश्रणाच्या मदतीने तुम्हाला साधारण दोन ते तीन मिनिटे चेहऱ्याला मसाज करावी लागेल. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे लागेल. नियमित याचा वापर केल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होऊ शकते.

मध आणि मलाई (Honey and cream-Dry Skin)

त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक शतकांपासून मधाचा वापर केला जातो. त्याचबरोबर मलाई देखील आपल्या त्वचेसाठी खूप उपयुक्त ठरते. यासाठी तुम्हाला एक चमचा मधामध्ये एक चमचा मलाई मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा ते वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

बेसन आणि मलाई (Besan and malai-Dry Skin)

कोरड्या त्वचेच्या समस्यावर मात करण्यासाठी बेसन आणि मलाईचे मिश्रण फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा बेसनामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा दुधाची मलाई मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा रात्री झोपण्यापूर्वी या मिश्रणाचा वापर केल्याने करण्याची समस्या दूर होऊ शकते.

उन्हाळ्यामध्ये कोरड्या त्वचेच्या समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने मलाईचा वापर करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचे चहाचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

ऍसिडिटीपासून आराम मिळतो (Provides relief from acidity-Mint Tea)

बहुतांश लोकांना पोटात गॅस आणि ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी पुदिनाच्या चहाचे सेवन करू शकतात. पुदिन्याच्या चहामध्ये आढळणारे घटक पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर दररोज याचे सेवन केल्याने ऍसिडिटीपासून आराम मिळतो.

डोकेदुखीपासून आराम (Relief from headache-Mint Tea)

उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी पुदिन्याच्या चहाचे सेवन करू शकतात. पुदिन्याच्या चहाचे सेवन केल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि मुड फ्रेश राहतो. त्याचबरोबर हा चहा प्यायल्याने तणाव कमी होतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.