Deepak Kesarkar | येत्या वर्षापासून लागू होणार नवीन शैक्षणिक धोरण: दिपक केसरकर

Deepak Kesarkar | मुंबई : नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार येत्या वर्षांपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली आहे. त्यामध्ये त्यांनी नक्की नवीन शैक्षणिक धोरण कसं असणार आहे आणि येणाऱ्या काळात त्याचा काय फायदा होणार आहे याबद्दल देखील भाष्य केलं. तसचं इंजिनियरिंग मेडिकल ही या पुढील काळात मराठीमध्ये शिकवलं जाणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शैक्षणिक धोरण पुढील काळात महत्त्वाचे ठराव यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कधी होणार याबाबत बोलताना केसरकर म्हणाले, राज्य सरकार देखील (Maharashtra Government) याची अंमलबजावणी महाराष्ट्रात येत्या शैक्षणिक वर्षापासून करणार असल्याची माहिती दिली. तसचं तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार असून या धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत देखील अनेक बदल करण्यात आले आहेत. देशात शालेय शिक्षणाचे स्वरुप आतापर्यंत 10+2 असं होतं. पण नव्या धोरणात दहावी किंवा बारावी परीक्षा ही बोर्डाची असेल, असा उल्लेख केलेला नाहीत. 10+2 ही शिक्षण पद्धत जाऊन त्याऐवजी 5+3+3+4 अशी नवी व्यवस्था लागू होईल असं त्यांनी सांगितलं.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार, कसे असतील शैक्षणिक वर्षाचे टप्पे:

पहिल्या टप्पा म्हणजेच पहिली पाच वर्ष : पूर्व प्राथमिकचे तीन वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरी आणि दुसऱ्या टप्पा म्हणजे पुढील तीन वर्ष  इयत्ता तिसरी ते पाचवी तर तिसऱ्या टप्पा म्हणजेच त्यानंतरची तीन वर्ष : सहावी ते आठवी आणि चौथ्या टप्पा म्हणजेच उर्वरित चार वर्ष : नववी ते बारावी असा असणार आहे. तसचं नवीन धोरणानुसार बोर्डाच्या परीक्षेचं महत्त्व कमी होणार असून सेमिस्टर पॅटर्नमध्ये ही परीक्षा असणार आहे. सध्या बोर्डाची परीक्षा वर्षातून एकदाच होते. परंतु यापुढे वर्षातून दोन वेळा सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजेच नववीपासून बारावीपर्यंतचं शिक्षण आठ सेमिस्टध्ये विभागण्यात आलं आहे. तर आता मुलांना एखाद्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार असल्याचं देखील सांगण्यात आलं. याचप्रमाणे या नवीन शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्य देखील स्पष्ट करण्यात आली. याबाबत बोलताना केसरकर यांनी येणाऱ्या काळात मुलांना शाळेत उत्तम आणि दर्जेदार शिक्षण दिल जानार असल्याचं सांगण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button