Naresh Mhaske | “त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, आमच्या ठाण्यातल्या मानसिक रुग्णालयात त्यांचा उपचार आम्ही करू”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Naresh Mhaske | मुंबई : राज्यात एकीकडे राजकारणात मोठा सत्तासंघर्ष सुरु आहे. हा वाद निवडणूक आयोगानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याची माहिती समोर येत आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर केलेल्या आरोपानंतर आता शिंदे गटाकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

संजय राऊतांचा गंभीर आरोप (Sanjay Raut’s Allegation

खासदार श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) ठाण्यातील एका कुख्यात गुंडाला माझ्या हत्येची सुपारी दिली, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. खासदार संजय राऊत यांनी आपल्यावर हल्ला होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. अधिक गंभीर बाब म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांनी हल्ल्याची जबाबदारी एका गुंडाला दिली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांच्या या आरोपावरुन शिंदे गटाने राऊतांवर बोचरी टीका केली आहे.

Naresh Mhaske Comment On Sanjay Pawar

“संजय राऊत यांचं डोकं फिरलंय. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांना उपचारांची गरज आहे. आमच्या ठाण्यातल्या मानसिक रुग्णालयात त्यांचा उपचार आम्ही करू. फक्त एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध टीका करायची आणि प्रसिद्धीच्या झोतात राहायचं असं त्यांचं धोरण आहे. शिवसेनेच्या ठाकरे गट उरलेल्या मंडळींबद्दल सहानुभूतीचं वातावरण तयार करायचं यासाठी ते असे उद्योग करत आहेत”, असे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले आहेत.

‘मांडवली बादशाह’ असं त्यांच्या कुटुंबीयांबद्दल बोललं जातं- Naresh Mhaske

“संजय राऊत सकाळी एक बोलतात, दुपारी एक बोलतात आणि संध्याकाळी एक बोलतात. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची अशी दशा होण्यामागे संजय राऊत आहेत अशी चर्चा उरलेल्या सैनिकांमध्ये दबक्या आवाजात आहे. त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ते अशी वक्तव्य करत आहेत. संजय राऊत, सुनील राऊत कायम गुंड टोळ्यांच्या संपर्कात असतात. ‘मांडवली बादशाह’ असं त्यांच्या कुटुंबीयांबद्दल बोललं जातं. ते सकाळी माध्यमांशी बोलतात तेव्हा त्यांच्या पाठीमागे उभी असलेली माणसं पाहा. त्यांचा पूर्वेतिहास पाहा. पोलीस स्थानकात त्यांच्या असलेल्या नोंदी पाहा. त्यामुळे स्वत: काचेच्या घरात राहून दुसऱ्यावर दगड मारण्याचा ते प्रयत्न करत आहेत”, असंही नरेश म्हस्के म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-