Shambhraj Desai | “ते खूप आराम करून आलेत, म्हणून त्यांच्या बोलण्यात ताळमेळ राहिला नाही”- शंभूराज देसाई

Shambhraj Desai | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्षनाव तसेच ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी त्यांच्यावर चांगलाच पलटवार केला आहे.

संजय राऊतांचा दावा

निवडणूक आयोगाचा निर्णय एकतर्फी आणि ‘मेरी मर्जी’वाल्यांच्या मर्जीसाठी दिलेला निर्णय आहे. शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह हे दडपशाही, दबाव, पैसा, सत्ता यामाध्यमातून मिळवलं आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या निकालासाठी मागील पाच महिन्यात 2 हजार कोटींच्या पॅकेजचा वापर करण्यात आला, असेही राऊत म्हणाले आहेत. राऊतांच्या याच दाव्यावर शंभुराज देसाई यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.

Shambhuraj Desai Comment on Sanjay Raut

“संजय राऊत संदर्भहीन बोलतात. विसंगत बोलतात. संजय राऊत काहीही म्हणत असले तरी आम्ही पाहिल्यापासून सांगत आहोत, आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. मात्र अगोदर न्यायव्यवस्थेवर आक्षेप घेणारे, न्यायालयाच्या कामकाजावर शंका व्यक्त करणारे संजय राऊत आज आमचा न्यायालयच आधार वाटतोय असे का म्हणत आहेत. ते विसंगत बोलत आहेत. मागच्या काळात तीन-साडेतीन महिने आराम करून आल्यामुळे त्यांच्या बोलण्यात ताळमेळ राहिलेला नाही, असे त्यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे,” असे शंभुराज देसाई म्हणाले आहेत.

“सुरक्षा काढली, हेच संजय राऊत यांचं खरं दुःख” Shambhuraj Desai criticize Sanjay Raut

“माझी सुरक्षा काढली, हेच संजय राऊत यांचं खरं दुःख आहे. मविआ सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीची सुरक्षा व्यवस्था संजय राऊतांना होती. आवश्यकता होती म्हणून दिली होती, का नसताना दिली होती, हा त्यांचा विषय आहे. पण ते अडीच वर्ष त्यांना सवय लागली होती. मुख्यमंत्र्यांसारखं पुढे मागे पोलिसांच्या गाड्या, सतत सुरक्षा व्यवस्थेत वावरायचं”, अशा शब्दात शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“स्वतःची सुरक्षा वाढवण्यासाठी  हा केविलवाणा प्रयत्न”- Shambhuraj Desai

“सत्तांतरानंतर सुरक्षेच्या बाबतीत जी समिती आहे. यात गृहमंत्री, पोलीस दलाचे अधिकारी, विशेष दलाचे अधिकारी आहेत. ही समिती दर तीन महिन्यांनी सुरक्षा द्यायची की नाही, याचा रिव्ह्यू घेते. सुरक्षा कमी करण्याचा निर्णय त्या समितीने घेतला. आता परत तो डामडौल हवा असेल तर असं एखादं पत्र द्यायचं, त्यात मा.मुख्यमंत्री यांच्या मुलाचं नाव घ्यायचं. खा. श्रीकांत शिंदे यांचं नाव घ्यायचं. स्वतःची सुरक्षा अनावश्यक वाढवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

“सुनावणीवर कोर्टाच्या बाहेर बोलणे योग्य नाही”

“कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर कोर्टाच्या बाहेर बोलणे योग्य वाटत नाही. आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या खटल्यात तीन दिवस सलग सुनावणी चालणार आहे. तेथे युक्तिवाद होतील. त्यानंतर काहीतरी ठोस निर्णय घेण्यात येईल. सुनावणी सुरू असताना त्यावर आपण बोलणे योग्य वाटत नाही,” अशी प्रतिक्रिया शंभुराज देसाई यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button