Bachchu Kadu | “मंत्रिमंडळाचा विस्तार आता झाला नाही तर २०२४ नंतरच होईल ” : बच्चू कडू

Bachchu Kadu | मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निर्णय जाहीर झाला आहे. त्यानंतर आता रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. तर शिंदे- फडणवीस सरकार स्थिर असल्याचं सांगितलं जातं असून येत्या काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट Sanjay Shirsat) यांनी म्हटलं. त्यावर आता प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू ( Bachchu Kadu ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले बच्चू कडू (What did Bachu Kadu say)

आमदार बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ विस्तराबाबतप्रश्न विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले, येत्या २१ ते २६ मेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. जर मंत्रिमंडळाचा विस्तार आता झाला नाही तर तो २०२४ नंतरच होईल. असे देखील बच्चू कडू म्हणाले. एकंदरीत ज्या काही वार्ता कानावर येत आहेत त्यावरून मी हे सांगतोय. असं देखील त्यांनी म्हटलं आहे. पुढे माध्यमांनी तुम्ही मंत्रिमंडळात दिसणार का असा प्रश्न विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले, मी मंत्रिमंडळात कधी येईन हे सांगता येत नाही. परंतु दिलेला शब्द पाळणार हे मात्र निश्चित आहे.

दरम्यान, बच्चू कडू यांनी सत्तासंघर्षाच्या निकालावर देखील भाष्य करत म्हटलं की, काही चुका कोर्टाने दाखवून दिल्या आहेत. मग त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यासाठी घाई केली, राज्यपालांचे अनेक निर्णय चुकीचे असल्याचं देखील कोर्टाने सांगितलं. तसचं शिंदे गटाचे भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली नियुक्तीही बेकायदेशीर असल्याचं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. यामुळे कोर्टाने योग्य निर्णय दिला आहे. तसचं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पहिल्यांदा काम रात्रंदिवस करत असल्यामुळे या निसर्गाने देखील त्यांची साथ दिली, काम करणारा मुख्यमंत्री आहे. असं बच्चू कडू म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-