मुंबई | प्रतिनिधी: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र आता पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये उघडं वातावरण पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी तुरळक सरी कोसळत आहेत.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले, “सध्याचं वातावरण मोकळं होईल आहे. खान्देश, विदर्भात उघडं वातावरण राहणार असून 20 टक्के भागात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.”
Maharashtra Monsoon Rain Update
ते पुढे म्हणाले की, “ कोकण, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगलीसारख्या भागांमध्ये अधूनमधून एक दिवसाआड पावसाचा अंदाज आहे.” मान्सून 15 जूनपासून पुन्हा सक्रीय होणार आहे. याची व्याप्ती दररोज सुमारे 45% भागांवर राहील. त्यामुळे एकाच दिवसात संपूर्ण राज्यात पाऊस पडेल अशी अपेक्षा बाळगू नये, असंही डखांनी स्पष्ट केलं.
डखांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, “14 जूनपर्यंत कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. या दरम्यान फक्त 20% भागात पाऊस असेल. पूर्ण मान्सून बसायला वेळ लागणार आहे.”
गेल्या आठवड्यात पावसाने काही भागात धुमाकूळ घातल्याने शेती, वाहतूक व जनजीवनावर मोठा परिणाम झाला होता. विशेषतः भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- ICC Womens World Cup 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर
- विचारधारा वेगळी, पण कुटुंब एकच; अजित पवारांचं राष्ट्रवादी एकत्रिकरणावर भाष्य
- “मी चक्रम आहे, घराला आग लावायला कमी करणार नाही” – संजय शिरसाटांचा विरोधकांना इशारा













