Mahadev Jankar | “मंत्री असताना मी सांगायचो, काँग्रेस आणि भाजप दोन्ही फसवे पक्ष”; जानकरांची बोचरी टीका

Mahadev Jankar | मुंबई : महाराष्ट्रात राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठा सत्तासंघर्ष सुरु झाला आणि शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी केली आणि राज्यात नवी सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर आता ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. आयोगाच्या या निर्णयाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. अशातच राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी या पार्श्वभूमीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“When I was a minister, I said that both Congress and BJP are fraudulent parties”

“मंत्री असताना मी सांगायचो, काँग्रेस आणि भाजप दोन्ही फसवे पक्ष आहेत. आम्ही बाहुले नाही, तर पक्षाचे मालक आहोत. जसे, मोठा मासा छोट्या माशाला खातो, तसं आम्हाला ते खात आहेत. त्यामुळे आम्हाला सावध राहावे लागणार आहे. काँग्रेसबरोबर गेलेल्या पक्षांची अवस्था बघा. आता काँग्रेसचेच भाजपा झालं आहे,” असं महादेव जानकर म्हणाले आहेत.

ज्यांचं बाळंतपण होत नाही त्यांनी बोलू नये”- Mahadev Jankar

“एखादं मंडळ काढणं सोपं असतं. पण, पक्ष काढणे खूप अवघड आहे. पक्ष काढणाऱ्याच्या हृदयाला काय वेदना होतात हे त्यालाच माहिती. बाळंतपणीला जी वेदना होते, ते ज्यांचं बाळंतपण होत नाही त्यांनी बोलू नये. त्या वेदनेशी सहमत आहे”, असेही महादेव जानकर म्हणाले आहेत.

2024च्या लोकसभा निवडणुकीबाबतचा विश्वास

“निवडणुकीच्या दृष्टीने 90 हजार पोलिंग बूथ आम्ही तयार करत आहे. 40 ते 42 टक्के काम पूर्ण झालं आहे. महाराष्ट्रातील सर्व 48 जागा लढण्याची आमची तयारी आहे. परभणी, बारामती, माढा, मिर्जापूर या चार मतदारसंघावर लक्ष केलं आहे. या चार मतदारसंघापैकी दोन जागी विजय निश्चित आहे,” असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-