Sanjay Raut | “हे सुपारी बाजांचं राज्य आहे का?”; संजय राऊतांचा संतप्त सवाल

Sanjay Raut | मुंबई : राज्यात अनेक वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे सत्तासंघर्षाची लढाई सुरु आहे. त्यावरुन शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गटामध्ये टीका-टिपण्णी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या हत्येचा कट असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर हत्येसाठी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या पुत्रावर हा आरोप केल्याने शिंदे गटाकडून आणि भाजपकडून राऊतांवर टीका करण्यात आली. आहे. संजय राऊत यांनी हा आरोप केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदेंवर पुन्हा आरोप करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

काय म्हणाले संजय राऊत?

“हे सुपारी बाजांचं राज्य आहे का? जे तुमच्या विरोधात बोलतात त्यांना तुम्ही अशा प्रकारे संपवणार आहात का? असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केलाय. आपल्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर (Raja Thakur)  याला खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुपारी दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी आहे. या आरोपानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना संपवलं जातंय”- Sanjay Raut

“सत्तेतील नेते, आमदार, खासदार धमकीची भाषा वापरतात. हा कट फक्त माझ्याबाबतीत नाही तर येणाऱ्या काळात अजूनही काही गोष्टी उघड होतील. मी कोकणातील पत्रकार शशीकांत वारीसे यांच्या कुटुंबींयांचे देखील भेट घेतली आहे. सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना संपवलं जात आहे. सरकार बदलल्यानंतर विरोक्षी पक्षातील लोकप्रतिनिधींची सुरक्षा काढून घेण्यात आली. त्यानंतर काँग्रेसच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्यावर हल्ला झाला”, असे संजय राऊतांनी सांगितले आहे.

“गुंडांना जामीनावर सोडून त्यांना असे टास्क देतात” Sanjay Raut criticize state government 

“राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धमकी देण्यात आली, काँग्रेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात आहे, आता मला मारण्यासाठी सुपारी देण्यात आली आहे. याबाबत माझी व्यक्तीगत तक्रार नाही. परंतु, राज्यात काय चालल आहे हे जनतेला आणि राज्यकर्त्यांना समजण्यासाठी मी तक्रार दिली आहे. तुरूंगात असणाऱ्या गुंडांना जामीनावर सोडून त्यांना असे टास्क दिले जात आहेत”, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊतांचा गंभीर आरोप (Sanjay Raut’s Allegation)

“केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहून आपल्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी देण्यात आल्याची माहिती दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई आणि ठाण्याच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहून माझ्यावर हल्ला करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला माझ्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिल्याची माहिती मला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. माझी सुत्रे ही अतीशय विश्वसनीय असतात. त्यामुळे माझ्यावर लवकरच हल्ला होण्याची शक्यता आहे”, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

“फोडलेल्या आमदार,खासदारांना सुरक्षा दिली अन्…”

“माझ्यावर हल्ला करण्यात येणार असल्याची माहिती असावी म्हणून मी गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून मी कोणत्याही प्रकारची सुरक्षा मागितलेली नाही. ज्या आमदार आणि खासदारांना पक्षातून फोडण्यात आलं त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.