Share

“नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची… “; Kishori Pednekar यांची बोचरी टीका

by MHD
Kishori Pednekar criticize Neelam Gorhe

Kishori Pednekar । राजकीय वर्तुळात सतत सत्ताधारी विरुद्ध विरोधक आमनेसामने येत असतात. नुकतीच ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर पदांच्या बदल्यात मर्सिडीज द्यावी लागत होती, असा आरोप केला होता.

यावरून आता राजकीय वाद सुरु झाला आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाचा नेत्या किशोरी पेडणेकर यांनी नीलम गोऱ्हे यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. “आजपर्यंत महापौरपर्यंत गेलो पण उद्धव ठाकरे यांनी आमचा पेढा घेतला नाही, ही बाई पिऊन बसली होती का? बाईला साहित्यिक परिषदेत कोणी भांडायला लावलं? कोणाची सुपारी घेतली?,” असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला.

“मुळात एक नंबरची ही खोटारडी बाई आहे. शिव्या घालायच्या लायकीची नाही. सतत मातोश्रीवर बसलेली असायची. सतत बोलायची थांबावं लागेल, तू होतीस कोण आणि तू करतेस काय? महिला आघाडी वाढवण्यासाठी कधीच काही केले नाही,” असा आरोप पेडणेकर यांनी केला.

पुढे त्या म्हणाल्या की, “ती माझी सहकारी कधीच नव्हती. जरी नाव गोऱ्हे असले तरी काम काळे आहे. स्वतःला हुशार समजणारी ही बाई आहे. तीन वेळा आमदार दोन वेळा उपसभापती झालेल्या या बाईने किती मर्सिडीज दिल्या? कोणाला दिल्या हे सांगावे,” असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला.

Kishori Pednekar on Neelam Gorhe

दरम्यान, नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे यांना उद्देशून केलेल्या टीकेचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहे. गोऱ्हे यांच्यावर पेडणेकर यांनी अतिशय जहरी टीका केली आहे. या टीकेला गोऱ्हे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

Kishori Pednekar has criticized Neelam Gorhe for criticizing the Thackeray group

Politics Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now