Share

“पहिल्या दोन आरोपींची TIP कुणाकडून आली?”, Anjali Damania यांचा मोठा सवाल

by MHD
Anjali Damania criticize Balaji Tandale

Anjali Damania । संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून (Santosh Deshmukh murder case) अजूनही राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. या प्रकरणावरून विरोधक सतत सत्ताधाऱ्यांवर आरोप करत असतात. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील या प्रकरणी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे.

बीड जिल्ह्यातील कोरेगाव येथील सरपंच बालाजी तांदळे (Balaji Tandale) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराडबाबत (Walmik Karad) एक विधान केले होते. यावरून अंजली दमानिया आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर यांनी बालाजी तांदळे यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

Anjali Damania post on X

अंजली दमानिया X वर लिहितात, “धनंजय मुंडे माझे दैवत, वाल्मिक कराड माझे नेते. असे म्हणणारे बाळाजी तांदळे यांना पत्र देऊन त्यांना बरोबर घेऊन, त्यांच्याच जवळच्या मित्रांचा, जे खुनाचे आरोपी आहेत, ह्यांना घेऊन पोलिस शोध करू शकतात का ? जे पकडले गेले ते “मुद्दाम पकडवून, बळी दिले गेले” ह्यात शंका आहे का? म्हणूनच कराड फरार राहू शकले आणि आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी दाखवले गेले की पोलिसांचा तपास चालू आहे. जर प्रकरण लावून धरलं नसतं तर कराडला देखील अटक झाली नसती,” असा दावा दमानिया यांनी केला.

“बालाजी तांदळे जो जमिनीचा बंदोबस्त करतो, प्रत्येक स्थळी उपस्थित असतो, तो शोधले आरोपींना? ह्याची नुसती चौकशी करून त्याला सोडून दिले ? ह्याला जर थर्ड डिग्री वापरून चौकशी केली, तर कळेल सगळा कुणाच्या सांगण्यावरून होत होते. पी आय गोसावी आणि भागवत शेलार यांचे सीडीआर जाहीर करा. पहिल्या दोन आरोपींची TIP कुणाकडून आली? देवेंद्र फडणवीस आता तरी काही बोलणार का अजून त्यांना गरज वाटत नाही?,” असा संतप्त सवाल देखील दमानिया यांनी उपस्थित केला.

Anjali Damania statement in Santosh Deshmukh murder case

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशातच आता त्यांनी पोलिसांच्या तपास पद्धतीवर अनेक गंभीर सवाल केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

Anjali Damania on her official X account has spoken harsh words to Balaji Tandale.

Marathi News

Join WhatsApp

Join Now