Kasba by Election | भाजपला ‘ती’ चूक भोवली; टिळक कुटुंबात उमेदवारी दिली असती तर कदाचित…

Kasba by Election | पुणे : पुणे शहरातील कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक पार पडली. या दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार होते. चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप आणि कसब्यातून मुक्ता टिळक या दोन्ही आमदारांच्या निधनानंतर या जागांवर पोटनिवडणुका जाहीर झाल्या. या पोटनिवडणुकीचे मतदार रविवारी 26 फेब्रुवारीला पार पडले आणि आज निकाल जाहीरही झाला.

राज्याच्या राजकारणात कसबा पोटनिवडणुकीची तुफान चर्चा झाली. या पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी न दिल्याने भाजप विरोधात कसब्यात नाराजीचा सूर उमटला होता. भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी न देता भाजपच्या हेमंत रासनेंना उमेदवारी दिली.

कसबा पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात होती. खुद्द टिळक कुटुंबातूनही तशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्याऐवजी भाजपाकडून माजी आमदार हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे कसब्यात भाजपाविरोधी नाराजी असल्याचं सांगितलं जात होतं.

भाजपने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही उमेदवारी न मिळाल्याने शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “20 वर्षे बरोबरीने काम करणाऱ्या पुणे शहरातील ताईंच्या सहकार्‍यांनी जाणीव ठेवायला पाहिजे होती. इतरांनी उमेदवारी मागितली नसती तर मुक्ता टिळकांना ती खरी श्रद्धांजली लाभली असती, मला आज खूप दुःख झालं”, असं शैलेश टिळक म्हणाले होते.

मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची नाराजी

‘मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुढील निवडणुकीचा काळ साधारणपणे सव्वा वर्षाचा राहिला आहे. तसेच त्यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्याची संधी कुटुंबीयांना द्यावी’, अशी इच्छा पक्षाकडे बोलून दाखवली होती.

“आजवरच्या घटनांमध्ये कुटुंबीयांपैकी एकाला संधी देण्यात आल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. हेच आम्हाला देखील वाटत होते. ताईंनी शेवटच्या श्वासापर्यंत पक्ष निष्ठा जपली, मात्र पक्षाच्या नेतृत्वाने वेगळा विचार केला असून, हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा”, असं शैलेश टिळक यांनी नाराजी देखील व्यक्त केली.

भाजपला कदाचित जागा राखता आली असती

दरम्यान, भाजपने आज तब्बल 28 वर्षांनी हातची जागा सोडली, असंच म्हणावं लागेल. कारण तब्बल 28 वर्षांनंतर कसब्यामध्ये आमदारकी भाजपकडून काँग्रेसकडे आली आहे. याआधी 1992 च्या निवडणुकीत कसब्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता.

The BJP could have retained this seat by fielding a candidate from the Tilak family

2009 मध्येही कसब्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी गिरीश बापट यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना विजय मिळवण्यात अपयश आलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपविरोधी नाराजी ही भाजपनेच ओढवून घेतली आहे. टिळक कुटुंबात उमेदवारी देऊन भाजपला कदाचित ही जागा राखता आली असती. 28 वर्ष राखलेला गड काँग्रेसच्या हाती देण्याची वेळ भाजपवर आली नसती.

दिग्गज नेत्या, मंंत्र्यांनी पुण्यात तळ ठोकला होता

कसब्यात भाजपविरोधात नाराजी पाहता भाजपचे दिग्गज नेत्यांनी पुण्यात तळ ठोकला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर, पुण्यातील इतर आमदार एवढंच नव्हे तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पुण्यातील कसबा मतदारसंघातील सर्व भाग पिंजून काढला होता.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.