Kasba By-Election | कसबा निकालाच्या पहिल्या फेरीत अभिजीत बिचुकले, आनंद दवेंना पडलेल्या मतांची चर्चा

By Poll Election | पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला टपाल मतांची मतमोजणी सुरु झाली. त्यानंतर पहिल्या फेरीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी मोठी आघाडी घेतली होती. पहिल्याच फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना 3 हजार मतांची आघाडी मिळाली होती. पहिल्या फेरीत महत्वाच्या लढती सोडून अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले आणि ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना पडलेल्या मतांची जोरदार चर्चा रंगली होती.

अभिजित बिचुकले यांनी कसबा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरून एक वेगळीच रंगत आणली होती. तर ‘कसब्यात ब्राह्मण समाजावर अन्याय झाल्याच्या’ मुद्द्यावरुन आनंद दवे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले होती. पहिल्या फेरीतील मतांची आकडेवारी या दोघांच्यादृष्टीने अत्यंत निराशाजनक म्हणावी लागेल. कारण, अभिजित बिचुकले यांना पहिल्या फेरीत अवघे 4 मतं मिळाली आहेत.

‘दोघांनी विजय आमचाच’ मतं पाहून सोशल मीडियावर जोरदार चर्चा

दोघांनी विजय आमचाच होईल असा दावा केला होता. त्यामुळे राजकीय पक्षांचे काय अशी चर्चा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. नेटकऱ्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. सहाव्या फेरी अखेर अभिजीत बिचुकले यांना फक्त बोटावर मोजण्या इतकी मतं मिळाली आहे.

विजयाचा दावा मतं मात्र फक्त 4

अभिजीत बिचुकले यांना अवघी 4 मतं मिळाली असून सहाव्या फेरी अखेर त्यामध्ये सातत्य कायम आहे. तर दुसरीकडे ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी विजयाचा दावा केला होता त्यांना तिसऱ्या फेरीपर्यंत अवघी 12 मते मिळाली आहे. तर सहाव्या फेरी अखेर त्यांना 100 मतं मिळाली आहे.

विजयाच्या दाव्यानंतर दवेंना पहिल्या फेरीत 12 मतं

‘आपल्याला कसब्यातील ब्राह्मण समाजाचा मोठा पाठिंबा मिळेल’, असा दावा करणाऱ्या आनंद दवे यांना पहिल्या फेरीत फक्त 12 मतं मिळाली आहेत. या दोघांपेक्षा नोटा या पर्यायाला अधिक मतं मिळाली आहे. पहिल्या फेरीत नोटा पर्यायाला 86 मतं पडली आहेत.

दरम्यान, निवडणूक पक्रिया जाहीर झाली तेव्हा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी माझाच विजय होणार असल्याचा दावा केला होता. टिळक कुटुंबात उमेदवारी न दिल्याने ब्राह्मण नाराज असल्याचे सांगत निवडणुकीत माझा विजय निश्चित असल्याचा दावा केला होता.

रवींद्र धंगेकर आघाडीवर

कसबा पोटनिवडणूक बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि आनंद दवे यांच्यामुळे अधिकच चर्चेत आली आहे. मात्र, यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात खरी लढत पहायला मिळत आहे. असून त्यामध्ये रवींद्र धंगेकर आघाडीवर आहे. रवींद्र धंगेकर यांना तिसऱ्या फेरीअखेर 11 हजार 157 मतं मिळाली असून हेमंत रासने यांना 10 हजार 673 मतं मिळाली आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली असून हेमंत रासने यांना मोठा धक्का दिला आहे. पेठांमध्येही रवींद्र धंगेकर आघाडीवर आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.