Share

Kapil Sibal | “वकिली करायची असेल, तर वकिली करा, पण…”, कपिल सिब्बलांचा शिंदे गटाच्या वकिलांना खोचक टोला

Kapil Sibal | नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जोरदार युक्तीवाद केला आहे. यावेळी कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या वकिलांना खोचक टोला लगावला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर द्या अशी नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातील याचिकेवर आज दुपारी साडेतीन वाजेपासून युक्तिवाद सुरु झाला. दोन्ही बाजूने जबरदस्त युक्तिवाद करण्यात आला. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर अनेक आरोप केले आहे.

“तुम्हाला वकिली करायची असेल, तर वकिली करा, पण…”- Kapil Sibal

“तुम्हाला वकिली करायची असेल, तर वकिली करा, तुम्हाला संसदेत जायचं असेल, तर संसदेसाठी तुमचा वेळ द्या, आपण एका वेळी एकच काम करू शकतो, एकावेळी दोन काम केली जाऊ शकत नाही, पक्षाबाबत महत्त्वाचे विषय न्यायालयासमोर आहेत आणि शिंदे गटाचे वकील इथं असावेत असं आम्हाला वाटतं, यामुळे दबाव वाढेल याची जेठमलानी यांना हळूहळू जाणीव होईल” असे कपिल सिब्बल म्हणाले आहेत.

“त्यांनी त्यांच्या व्यवसायावर लक्ष दिलं पाहिजे” 

सिब्बल यांच्यानंतर ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवींनी सर्वोच्च न्यायलयाच्या सुनावणीत डाव्या नेत्याचं एक उदाहरण दिलं आहे. “संसदेत डाव्या पक्षाच्या एका आघाडीच्या नेत्याने म्हटलं होतं की, वकील, सनदी लेखापाल, डॉक्टर आणि अशा प्रकारच्या पेशातील लोक संसदेत नसावेत. त्यांनी त्यांच्या व्यवसायावर लक्ष दिलं पाहिजे”, असे मनु सिंघवी म्हणाले आहेत.

कपिल सिब्बल यांचा आरोप (Kapil Sibal Allegation)

निवडणूक आयोगाने पक्षाच्या घटनेचा मुद्दा उपस्थित करुन शिंदेंना लोकप्रतिनिधींच्या संख्येनुसार निकाल दिला. याउलट पक्षाच्या घटनेत झालेल्या बदलांविषयी सविस्तर माहिती निवडणूक आयोगाला पाठवली होती. पण आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Kapil Sibal | नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जोरदार …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now