Sharad Pawar | शपथविधीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले,“शपथविधीमुळे एक फायदा”

Sharad Pawar | पुणे : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या वेळीच फडणवीसांनी मुख्यमंत्री तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. या शपथविधीची कोणाला काहीच खबर नसल्याचं अनेक नेत्यांनी सांगितलं. या राजकीय भुकूंपाची आजही चर्चा रंगत आहे.

फडणवीसांचा खळबळजनक दावा

“शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी झाला होता. मी तुम्हाला अर्धीच गोष्ट सांगतो. बाकीची गोष्ट नंतर सांगेल”, असा मोठा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा या शपथविधीवरुन मोठी खळबळ उडाली होती.

शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार यांनी बंड केलं होतं का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली होती. तर शरद पवार यांनी या विषयावर मौन बाळगल्याने फडणवीस यांच्या दाव्याला बळ मिळत होते. मात्र, अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मुद्द्यावर मौन सोडलं आहे. पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार आज चिंचवडच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार नाना काटेंच्या प्रचारसभेवेळी बोलत होते.

“शपथविधीमुळे एक फायदा झाला” (Sharad Pawar’s big statement regarding the swearing-in ceremony)

“पहाटेच्या शपथविधीतून सरकार बनविण्याचा प्रयत्न झाला खरा. पण त्यातून एक फायदा झाला. तो म्हणजे राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांनी अत्यंत तोलून मापून आणि सूचक विधान केलं आहे. त्यामुळे आता नाना तर्कवितर्क लढवले जात आहेत. पवार यांना नेमकं काय सूचवायचं आहे? या शपथविधीमागे पवारच आहेत काय? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.

“राज्यातील प्रत्येक गोष्टीला मलाच जबाबदार धरतात”- Sharad Pawar

“राज्यातील प्रत्येक गोष्टीला शरद पवार यांनाच जबाबदार धरलं जातं. त्यावरही त्यांना विचारण्यात आलं असता पवारांनी मिश्किल उत्तर दिलं. महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्ये आहे. काही झालं तरी एकाच व्यक्तीचं नाव येतं. मग राजकारणात भूकंप झाला तरी तेच नाव येतं”, असा चिमटा शरद पवार यांनी काढला आहे.

“ऐनवेळी केलेल्या बंडखोरीने काही फरक पडत नाही” (Sharad Pawar talk about Rahul Kalate)

“माझा एक अनुभव आहे. ऐनवेळी केलेल्या बंडखोरीने काही फरक पडत नाही. चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत पाहायला मिळणार आहे. प्रत्येक व्यक्तीला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे वंचितची सभा होत असेल”, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.