Big Breaking | ठाकरेंच्या पदरी निराशा कायम; निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास न्यायलयाचा नकार

Big Breaking | नवी दिल्ली : राज्यात शिवसेनेचा मोठा वाद सुरु आहे. केंद्रीय आयोगाच्या निर्णयानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला असून सर्वोच्च न्यायालयाकडूनही ठाकरेंच्या पदरी निराशाच आली आहे. दोन आठवडे ठाकरेंच्या आमदारांवर कारवाई करता येणार नाही, मात्र आयोगाच्या निर्णायाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

पक्ष आणि चिन्हावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात  जोपर्यंत सुनावणी सुरु आहे, तोपर्यंत मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला कायम ठेवण्यात येणार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.

ठाकरे गटाकडून जोरदार युक्तावाद

शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला देण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यानंतर लगेच ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्णायावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने यावर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज यावर सुनवणी झाली. यामध्ये दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद झाला आहे.

“तोपर्यंत आयोगाच्या आधारावर व्हीप काढला तर ठाकरे गटाला लागू नाही”

“सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची पुढील सुनावणी घेत नाही, तोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आधारावर व्हीप काढला तर ठाकरे गटाला लागू होणार नाही. ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात व्हीप काढणार नाही, अपात्र करणार नाही”, असे आश्वासन शिंदे गटाने न्यायालयात दिले आहे.

Kapil Sibal big Argument

दरम्यान, “हा फक्त व्हीपपुरता मर्यादीत मुद्दा नाही. कारण अनेक अर्थांनी हा मुद्दा महत्वाचा आहे. कारण व्हीप बाजूला ठेवला तर पक्षाच्या संपत्ती आणि मालमत्तेवर ताबा मागितला जाऊ शकतो. त्यामुळे या निर्णायाला संपूर्ण स्थिगिती द्यावी”, असे ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.