Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! राज्य शासनाच्या ‘या’ विभागात भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 4 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये महाव्यवस्थापक (विपणन) / General Manager (Marketing) 01 जागा, उपमहाव्यवस्थापक (वित्त आणि लेखा) / Deputy General Manager (Finance & Accounts) 01 जागा, उपमहाव्यवस्थापक (प्रोसेसिंग) / Deputy General Manager (Processing) 01 जागा आणि उपमहाव्यवस्थापक (उत्पादन) / Deputy General Manager (Production) 01 जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 13 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावे लागणार आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

महाव्यवस्थापक (प्रशासन), महाराष्ट्र राज्य बियाणे निगम लिमिटेड, महाबीज भवन, कृषी नगर, अकोला (एमएस) 444 104.

जाहिरात पाहा

https://mahabeej.com/jobs/Feb2023/DetailedAdvt-GMDGM.pdf

अधिकृत वेबसाईट

https://mahabeej.com/

महत्वाच्या बातम्या