Job Opportunity | महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांसाठी भरती सुरू, आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (Maharashtra Information Technology Corporation) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 20 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये उपमहाव्यवस्थापक / Deputy General Manager 03 जागा, प्रकल्प व्यवस्थापक / Project Manager 02 जागा, खाते अधिकारी / Account Officer 01 जागा, खर्च लेखापाल / Cost Accountant 01 जागा, कायदेशीर सहाय्यक / Legal Assistant 01 जागा, वरिष्ठ नेटवर्क अभियंता / Senior Network Engineer 01 जागा, नेटवर्क अभियंता / Network Engineer 02 जागा, O & M अभियंता / O & M Engineer 04 जागा, आयटी कार्यालय सहाय्यक / IT Office Assistant 01 जागा, नेटवर्क व्यवस्थापक / Network Manager 01 जागा, आयटी पायाभूत सुविधा व्यवस्थापक / IT Infrastructure Manager 01 जागा, O & M व्यवस्थापक / O & M Manager 01 जागा आणि RFMS विशेषज्ञ (GIS तज्ञ) / RFMS Specialist (GIS Expert) 01 जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) अर्ज करताना इच्छुक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी करावी लागणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 10 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://mahait.org/Site/CurrentOpening

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://mahait.org/

महत्वाच्या बातम्या