Digestive System | पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पेयांचा समावेश

Digestive System | टीम कृषीनामा: निरोगी राहण्यासाठी पचनसंस्था सुरळीत असणे खूप महत्त्वाचे आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवय आणि अनियमित जीवनशैलीमुळे पचनसंस्था हळूहळू कमकुवत होत जाते. जेव्हा तुमची पचन संस्था नीट काम करत नाही तेव्हा पोट फुगणे, गॅस, बद्धकोष्टता, अपचन यासारख्या समस्या निर्माण व्हायला लागतात. या समस्या दीर्घकाळ राहिल्यास गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पचन संस्था निरोगी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. पचन संस्था निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही खास पेयांचा समावेश करू शकतात. पचन संस्था तंदुरुस्त आणि मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही पुढील पेयांचा तुमच्या आहारात समावेश करू शकतात.

लिंबू पाणी (Lemon water-For Digestive System)

लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते आणि शरीराची पीएच पातळी देखील वाढवते. त्याचबरोबर लिंबामध्ये आढळणारे सायट्रिक ऍसिड शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात, जे पचन सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. यासाठी तुम्हाला रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्याचे सेवन करावे लागेल. दररोज याचे सेवन केल्याने पोटाच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकतो.

बडीशेप पाणी (Fennel water-For Digestive System)

पचनक्रिया मजबूत करण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपच्या पाण्याचे सेवन करू शकतात. बडीशेपमध्ये फायबर, झिंक, आयरन, पोटॅशियम यासारखे घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे बडीशेपचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत राहण्यास मदत होते. त्याचबरोबर बडीशेपच्या पाण्याचे सेवन केल्याने आम्लपित्तसारख्या समस्या देखील कमी होऊ शकतात. त्याचबरोबर या पाण्याचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहू शकते.

मेथी दाण्याचे पाणी (Fenugreek seed water-For Digestive System)

मेथी दाण्यांमध्ये अनेक पोषक गुणधर्म आढळून येतात. यामध्ये विटामिन सी, फायबर, प्रोटीन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयरन यासारख्या घटकांचा समावेश आहे. मेथीदाण्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि पचन संस्था निरोगी राहते. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथी दाणे टाकून पाणी उकळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे पाणी गाळून कोमट करून त्याचे सेवन करावे लागेल. दररोज या पाण्याचे सेवन केल्याने बद्धकोष्टता आणि अपचनाच्या समस्या दूर होऊ शकतात.

पचन संस्था मजबूत करण्यासाठी तुम्ही वरील गोष्टींचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर केस गळतीच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही खालील गोष्टींचा वापर करू शकतात.

कोरफड (Aloevera-For Hair Fall)

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. कोरफड केसांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. कोरफडीच्या मदतीने केसांच्या वाढीस चालला तर मिळतेच पण त्याचबरोबर केस गळती थांबते. यासाठी तुम्हाला केसांना कोरफडीचा गर साधारण 30 मिनिटे लावून ठेवावे लागेल. तीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस कोमट पाण्याने धुवावे लागते. नियमित कोरफडीचा गर केसांना लावल्याने केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.

कांद्याचा रस (Onion juice-For Hair Fall)

केसांच्या समस्यांवर मात करण्यासाठी कांद्याचा रस फायदेशीर ठरू शकतो. त्याचबरोबर केस गळतीची समस्या थांबवण्यासाठी कांद्याचा रस उपयुक्त ठरू शकतो. कांद्यामध्ये आढळणारे सल्फर केस गळती कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं कांद्याचा रस केसांना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस कोमट पाण्याने धुवावे लागतील. नियमित कांद्याचा रस केसांना लावल्याने केस निरोगी राहू शकतात.

ग्रीन टी (Green tea-For Hair Fall)

ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे केसांची वाढ होण्यास आणि केस गळती थांबवण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला ग्रीन टी बनवून तो थंड करून त्यानंतर तो केसांना लावावा लागेल. तुम्हाला  ग्रीन टी तासभर केसांवर ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस थंड पाण्याने धुवावे लागतील.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Hair Fall | ‘या’ गोष्टी थांबवू शकतात केस गळती, जाणून घ्या

Dark Elbow | हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी वापरा ‘या’ आयुर्वेदिक पद्धती

Amla and Curd | दही आणि आवळ्याच्या मदतीने केसांच्या ‘या’ समस्या होऊ शकतात दूर

Green Coffee | स्किन केअर रुटीनमध्ये करा ग्रीन कॉफीचा समावेश, मिळतील ‘हे’ अनोखे फायदे

Buttermilk and Jaggery | ताकासोबत गुळाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Back to top button