COVID – 19 | देशातील कोरोना रुग्ण संख्येत वाढ! 24 तासांत आढळले ‘इतके’ नवे रुग्ण

COVID – 19 | टीम महाराष्ट्र देशा: देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण (Corona patient) संख्येत झपाटाने वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. देशामध्ये आजही कोरोना रुग्णांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे.

शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशामध्ये गेल्या 24 तासांत 11,692 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहे. देशामध्ये सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 66,170 आहे. तर या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

भारतामध्ये कोरोना संसर्गाचा साप्ताहिक दर 5.1 टक्के आहे. त्याचबरोबर, या संसर्गाचा दैनंदिन दर सुमारे 4.39 टक्के आहे. दरम्यान, भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.67 टक्के आहे. कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण 1.18 टक्के आहे. देशात आतापर्यंत एकूण 4,48,69,68 लोक संसर्गमुक्त झाले आहे.

देशामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत चालली आहे. देशात एका दिवसामध्ये हजाराहून अधिक रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून सातत्याने केले जात आहे. त्याचबरोबर नियमित मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

महत्वाच्या बातम्या