Sanjay Raut । खारघर दुर्घटना प्रकरण संजय राऊतांना भोवणार, तर त्यांच्या विरोधात ठाण्यात तक्रार दाखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Kharghar Heat Stroke । मुंबई : सध्या खारघर दुर्घटनाप्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. तर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार टीका टिप्पणी सुरु आहे. तसचं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकरणी चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्याचीही मागणी देखील केली आहे. याचप्रमाणे शिंदे- फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. राऊत यांच्या मते खारघर दुर्घटनेत 50 जणांचा मृत्यू झाला, हे वक्तव्य खासदार संजय राऊतांना भोवण्याशी शक्यता आहे. कारण राऊतांच्या या वक्तव्याविरोधात शिवसेनेने मरिन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत (What did Sanjay Raut say)

संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला बुच लावलं आहे का? ते बोलत का नाहीत ? तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत? त्यांना मन आहे की नाही, अस प्रश्न राऊतांनी उपस्थित केला. तसचं खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या घटनेवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्याचीही मागणी संजय राऊतांनी केली. यामुळे त्यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, किरण पावसकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांच्याकडे तक्रार केली आहे. संजय राऊतांचं हे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारं असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

दरम्यान, काल २० एप्रिलला प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळं मृत्यू झालेल्या श्रीसदस्यांच्या मृत्यूचं कारण समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या बहुतेक श्रीसदस्यांनी आधीच सहा- सात तासात पाणीच प्यायलं नसल्याचं दिसून आलंय. काहींच्या पोटात अगदी कमी प्रमाणात अन्न गेलं होतं, तर बहुतेक जणांच्या पोटात अन्नाचा कणही नसल्याचंही दिसून आलं. तर या संदर्भात चौकशी करण्यासाठी एक सदस्यीस समिती स्थापन करण्यात आली आहे. यामुळे या प्रकरणावरून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अॅक्शन मोडमध्ये आलेले आहेत. तर आता काय असेल या प्रकरणी सरकारची भूमिका याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.