Sharad Pawar | शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात बंद दाराआड दोन तास चर्चा, राजकीय वर्तुळात खळबळ

Sharad Pawar | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) चर्चेत आहेत. तर आज (20 एप्रिल) गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी गौतम अदानींनी भेट देत त्या दोघांमध्ये तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा झाली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गौतम अदानी यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओकवर जाऊन त्यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली आहे. तसंच त्यांच्यात नेमक्या तसचं नक्की कोणत्या मुद्दयावर चर्चा झाली, याबाबत अद्याप
माहिती मिळालेली नाहीये. मात्र, या दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

काय होती शरद पवारांची भूमीका (What was the role of Sharad Pawar)

याचप्रकारे मागील काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी हिंडेनबर्ग प्रकरणी त्यांची स्पष्ट भूमिका मांडली होती. सुप्रीम कोर्टानं चौकशी समिती स्थापन केल्यानंतर जेपीसीची आवश्यकता नाही, असं पवार म्हणाले होते. मात्र, पवारांनी केलेल्या या वक्तव्यावर काँग्रेसह इतर पक्षांनी जेपीसी चौकशीवर ठाम असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातं होत तसचं शरद पवार हे अदानी समूहाची पाठराखण करत असल्याचं बोललं जातं होत.

दरम्यान, गौतम अदानी आणि शरद पवार यांचे खुप जुने संबंध आहेत. यापूर्वीही महाविकास आघाडीचे सरकार असताना अदानींनी बारामतीला भेट दिली होती. बारामतीत सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरच्या उद्घाटनाला अदानींनी हजेरी लावली होती. तसंच या उद्घाटनासाठी अदानींसोबत आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिले होते.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button