Glowing Skin | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी दुधाच्या मलाईचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Glowing Skin | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी (Skin care) अधिक घ्यावी लागते. कारण उन्हाळ्यात धूळ, माती, सूर्यकिरण इत्यादी गोष्टींमुळे चेहऱ्यावरील चमक नाहीशी होत जाते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, ही उत्पादन त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकतात. यासाठी तुम्ही दुधाच्या मलाईचा (Milk cream) वापर करू शकतात. दुधाच्या मलाईचा वापर केल्याने त्वचेच्या अनेक समस्या सहज दूर होतात. त्याचबरोबर चेहऱ्यावरील चमक वाढते. चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने दुधाच्या मलाईचा वापर करू शकतात.

हळद आणि दुधाची मलाई (Turmeric and milk cream For Glowing Skin)

चेहरा चमकदार बनवण्यासाठी अनेक शतकांपासून हळदीचा वापर केला जातो. त्याचबरोबर चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही दुधाच्या मलाईचा आणि हळदीचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे मलाईमध्ये दोन चमचे हळद मिसळून पेस्ट बनवून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण पंधरा ते वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील डाग दूर होतात.

बेसन आणि मलई (Besan and cream For Glowing Skin)

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही मलई आणि बेसनाचे मिश्रण चेहऱ्याला लावू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा बेसनामध्ये एक चमचा मलाई मिसळून मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाते आणि त्वचा चमकदार होते.

चंदन आणि मलई (Sandalwood and cream For Glowing Skin)

चंदन पावडर आणि दुधाची मलाई त्वचेवर लावल्याने चेहरा चमकदार होऊ शकतो. यासाठी तुम्हाला एक चमचा चंदन पावडरमध्ये एक चमचा मलाई मिसळून मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर राहून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने त्वचेवरील डाग आणि पुरळ दूर होऊ शकते.

चेहरा चमकदार बनवण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने दुधाच्या मलाईचा वापर करू शकतात त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये धन्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

लघवीची जळजळ कमी होते (Urinary inflammation is reduced-Coriander Seeds Water Benefits)

उन्हाळ्यामध्ये अनेकांना लघवी करताना जळजळ होते. धन्याच्या पाण्याचे सेवन केल्याने लघवी करताना होणारी जळजळ दूर होऊ शकते. त्याचबरोबर या पाण्याचे सेवन केल्याने लघवीशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही धन्याच्या पाण्याचे सेवन करू शकतात.

पित्त शांत होते (Pitta calms down-Coriander Seeds Water Benefits)

उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोकांना गरम वातावरणामुळे पित्ताचा त्रास व्हायला लागतो. यामध्ये ऍसिडिटी, खाज येणे, डोके दुखी इत्यादी समस्या निर्माण व्हायला लागतात. या समस्यांवर मात करण्यासाठी धन्याचे पाणी उपयुक्त ठरू शकते. या पाण्यामध्ये आढळणारे गुणधर्म पित्त शांत करण्यास मदत करतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या