Share

Covid-19 | देशात कोरोना रुग्ण संख्येत वाढ; तर ‘या’ राज्यांत मास्क सक्ती

Covid- 19 Update |  पुन्हा देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. तर दररोज नवीन कोरोना सक्रिय रूग्ण संख्येत देखील वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील काही राज्यांमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. तसंच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्लीतील सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार कोरोना संसर्गामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सोमवार आणि मंगळवारी देशभरात मॉकड्रिल घेण्याची तयारी सुरू आहे.

दरम्यान, काही राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याने त्या ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये मास्क घालणे अनिवार्य केले आहे. तर जिल्हा प्रशासन आणि पंचायतींनाही कोरोना प्रोटोकॉल पाळले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचप्रमाणे केरळ सरकारने गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांसाठी मास्क अनिवार्य केले आहेत.

पुद्दुचेरी प्रशासनाने तत्काळ प्रभावाने सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहेत. याचप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सर्व विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. काल म्हणजे (9 एप्रिलला ) 24 तासांत देशात 5,357 नवीन रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या 32,814 वर पोहोचली आहे. तर शनिवारी(8 एप्रिलला) 6,155 नवीन प्रकरणांची नोंद झाली होती. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 1801 नवीन रुग्ण आढळले आहेत. एर्नाकुलम, तिरुअनंतपुरम आणि कोट्टायम जिल्ह्यात वेगाने रुग्ण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रत्येक राज्यातील आरोग्य सुविधा वाढवण्यात येत असल्याच पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या- 

Covid- 19 Update |  पुन्हा देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. तर दररोज नवीन कोरोना सक्रिय रूग्ण संख्येत देखील वाढ …

पुढे वाचा

Health India

Join WhatsApp

Join Now