Weather Update | राज्यात कमाल तापमानात वाढ, जाणून घ्या हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये कमाल आणि किमान तापमानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. पूर्वेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे. पुणे शहराचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी पहाटे थंडीचा कडाका आणि दुपारी उन्हाचे चटके जाणवत आहे. या वातावरणाचा (Weather Update) परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.

सध्या राज्यामध्ये उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह थांबला आहे. मात्र पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे दिवसाचे कमाल तापमान वाढले आहे. राज्यातील तापमान सरासरीच्या तुलनेत 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढले आहे. त्याचबरोबर वातावरण निरभ्र असल्यामुळे देखील सूर्यकिरणे थेट जमिनीवर येत असून कमाल तापमानात वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस ही स्थिती कायम राहण्यार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून (Weather Update) व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात दुपारच्या उन्हाचा तडाका वाढणार आहे.

गेल्या 48 तासात राज्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. रत्नागिरीमध्ये 38.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. तर पुण्यामध्ये 32.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले आहे. येत्या दोन दिवसांमध्ये शहरातील तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून (Weather Update) व्यक्त करण्यात आला आहे.

उन्हाळ्यात काळजी घ्या (Take care in summer)

दरम्यान, थंडी संपतात लगेच उन्हाचे चटके जाणवायला (Weather Update) सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करून शरीर हायड्रेट ठेवा. उन्हाळ्यात लिंबू पाणी, सरबत, ज्यूस इत्यादी गोष्टी प्या. त्याचबरोबर घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेऊनच बाहेर पडा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button