Soften Hair | रेशमी आणि मऊ केस हवे असतील तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Soften Hair | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये केस अधिक कोरडे होतात. या ऋतूमध्ये उष्ण हवामानामुळे केसांची काळजी घ्यावी लागते. केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, या उत्पादनामुळे केसांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय वापरू शकतात. हे घरगुती उपाय केल्याने केस निरोगी राहू शकतात. केसांना रेशमी आणि मऊ  बनवण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

ॲपल व्हिनेगर (Apple Vinegar-Soften Hair)

केसांना मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही शाम्पूमध्ये ॲपल व्हिनेगर मिसळू शकतात. ॲपल व्हिनेगरच्या वापरामुळे पीएच पातळी नियंत्रणात राहते. ॲपल व्हीनेगर शाम्पूमध्ये मिसळून केसांना लावल्याने टाळूची त्वचा तेलकट होत नाही. तुम्ही आठवड्यातून दोनदा ॲपल व्हीनेगर शाम्पूमध्ये मिसळून केसांना लावू शकतात.

कांद्याचा रस (Onion juice-Soften Hair)

केसांची काळजी घेण्यासाठी कांदा उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला मिक्सर किंवा ग्राइंडर मध्ये कांदा बारीक करून त्यामधून रस काढून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे केसांना कांद्याचा रस लावून ठेवावा लागेल. कांद्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म केस चमकदार आणि मुलायम बनवण्यास मदत करतात.

दही (Curd-Soften Hair)

दही आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. केसांवर दह्याचा वापर केल्याने केस चमकदार आणि मऊ होऊ शकतात. यासाठी तुम्हाला साधारण अर्धा तास दही केसांना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नियमित शाम्पूने केस धुवावे लागतील. दही केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतो.

केसांना रेशमी आणि मऊ बनवण्यासाठी तुम्ही वरील घरगुती उपाय वापरू शकतात. त्याचबरोबर केस गळतीच्या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही खालील आयुर्वेदिक टिप्स फॉलो करू शकतात.

आवळ्याचा मुरब्बा (Amla marmalade for Hair Fall)

आवळ्याचा मुरब्बा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्याच्या मुरब्ब्यात भरपूर प्रमाणात फायबर, आयरन, ओमेगा 3 आणि विटामिन सी आढळून येते. हे घटक इम्युनिटी पॉवर वाढवण्यासोबतच केस गळतीच्या समस्येवर मात करू शकतात. याचे नियमित सेवन केल्याने केसांच्या वाढीस चालना मिळते आणि केस निरोगी राहण्यास मदत होते.

हिरव्या पालेभाज्या (Green vegetables for Hair Fall)

केस गळतीची समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करू शकतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम, बीटा केरोटीन आणि विटामिन सी आढळून येते. जे केस गळतीची समस्या थांबवू शकते. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने केस मजबूत होऊ शकतात.

गुळ (Jaggery for Hair Fall)

गुळाचे सेवन केल्याने केस गळती थांबू शकते. त्याचबरोबर गुळाचे नियमित सेवन केल्याने हिमोग्लोबिन वाढून पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. गुळाचे सेवन केल्याने तुम्ही मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात. गुळ खाल्ल्याने केस मजबूत आणि निरोगी राहतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या