Share

Coconut Water | नारळाच्या पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Coconut Water | टीम महाराष्ट्र देशा: नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाण्यासोबत लिंबाचा रस आणि मधाचे सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. कारण लिंबाचा रस आणि मध या दोन्हीमध्ये विटामिन सी आणि अनेक औषधी गुणधर्म … Read more

Published On: 

Coconut Water | टीम महाराष्ट्र देशा: नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाण्यासोबत लिंबाचा रस आणि मधाचे सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. कारण लिंबाचा रस आणि मध या दोन्हीमध्ये विटामिन सी आणि अनेक औषधी गुणधर्म उपलब्ध असतात, जे अनेक गंभीर आजारापासून तुमचे संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. नारळ पाणी लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.

हृदय निरोगी राहते (The heart remains healthy-Coconut Water, Honey and Lemon Water)

नारळ पाणी, लिंबाचा रस आणि मधाचे एकत्र सेवन केल्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते. यामुळे हृदयाला ऑक्सिजन आणि भरपूर पोषण मिळते. त्याचबरोबर या मिश्रणाचे सेवन केल्याने हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते, परिणामी हृदय निरोगी राहते.

किडनीसाठी फायदेशीर (Beneficial for kidneys-Coconut Water, Honey and Lemon Water)

नारळ पाणी किडनीचे कार्य सुधारण्यास मदत करते. तर लिंबाचा रस आणि मध उत्तम डिटॉक्सिफायर म्हणून काम करतात. हे घटक किडनीला फिल्टर करण्यास मदत करतात आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकतात. नारळ पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो.

ब्लड शुगर नियंत्रणात राहते (Blood sugar remains under control-Coconut Water, Honey and Lemon Water)

नारळ पाण्यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते. या पेयाचे सेवन केल्याने डायबिटीसचा धोका कमी होतो आणि त्याचबरोबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. या मिश्रणाचे नियमित सेवन केल्याने वजन देखील नियंत्रणात राहू शकते.

नारळ पाण्यासोबत लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर दररोज लिंबू पाण्याचे सेवन केल्याने पोटाच्या खालील समस्या दूर होऊ शकतात.

गॅस (Gas-Lemon Water Benefits)

पोटात गॅस होत असेल तर लिंबू पाणी त्याच्यासाठी एक रामबाण उपाय आहे. लिंबू पाण्यात हायड्रोक्लोरिक ऍसिड आढळून येते, जे गॅसची समस्या दूर करण्यास मदत करते. उन्हाळ्यामध्ये गॅसची समस्या निर्माण झाल्यास तुम्ही दिवसभरात दोन ग्लास लिंबू पाण्याचे सेवन करू शकतात.

बद्धकोष्टता (Constipation-Lemon Water Benefits)

लिंबू पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते. याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. उन्हाळ्यामध्ये एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने पोट दुखी, ऍसिडिटी, आंबट ढेकर इत्यादी समस्या सहज दूर होऊ शकतात. त्यामुळे दररोज लिंबू पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

जुलाब (Diarrhea-Lemon Water Benefits)

उन्हाळ्यात पाण्याच्या अभावामुळे जुलाबाची समस्या निर्माण होते. त्याचबरोबर या ऋतूमध्ये अन्न नीट पचत नाही, त्यामुळे पोट दुखी आणि जुलाब यासारख्या समस्या निर्माण होतात. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही दररोज लिंबू पाण्याचे सेवन करू शकतात. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने जुलाबाची समस्या दूर होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही