Uddhav Thackeray | “एवढं लाचारत्व मी कधीच पत्करलेलं नाही”; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

Uddhav Thackeray | मुंबई : आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर एकामागून एक टीकेचे बाण सोडले आहेत.

“कोणी जसं म्हणेल तशी मी भूमिका घ्यायची, एवढं लाचारत्व मी कधीच पत्करलेलं नाही आणि तसं आयुष्यात कधी पत्करणार नाही. विजय साळवे इथे बसले आहेत. कल्याणच्या महापालिकेच्या सभेचे तो दाखला आहे. तिकडे आता जे बसले आहेत त्यांनी तेव्हा सभेमध्ये नाटक केलं होतं”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“जी खाती मिळाली ती पदरी पडली, पवित्र झाली की नाही ते माहिती नाही”

“तेव्हा शिवसेना आणि भाजपचं सरकार होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. उपमुख्यमंत्रीपद ना त्यांनी दिलं आणि ना आम्ही त्यांच्याकडे मागितलं. जी काही खाती मिळाली ती पदरी पडली पवित्र झाली की नाही ते माहिती नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“तेव्हा याच माणसाने नाटक केलं”

“कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेच्या सभेमध्ये याच माणसाने नाटक केलं होतं की, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर भाजप जो अन्याय करतोय हे मी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. म्हणून मी डोळे मिटून तिकडे जातो, असं असेल तर मला माहिती नाही. तेव्हा आम्ही भाजपसोबत होतो तर भाजप अन्याय करतो, आता काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आहोत तर काँग्रेस-राष्ट्रवादी अन्याय करतं. मग नेमकं तुम्हाला पाहिजे तरी काय? बरं खायचं तर मोकळंच होतं ना रान, मी त्याबद्दल कधीच विचारलं नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray Target Eknath Shinde

“मला अनेकवेळा विचारलं जातं, आमदार बंडखोरी करणार आहेत हे तुम्हाला कळलं नव्हतं का? तर मी त्यांना सांगायचो, हो कळलं होतं. तर काहीजण विचारतात मग तुम्ही त्यांना थांबवलं का नाही? मी त्यांना म्हटलं कशासाठी थांबवू मी या लोकांना?”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“जी माणसं विकली गेली आहेत त्यांना सोबत घेऊन मी ही लढाई कशी लढू? मला ती विकली गेलेली माणसं नकोत, मला लढाऊ माणसं हवीत. ही विकली गेलेली माणसं शिवसैनिक म्हणायच्या लायकीची नाहीत. मी सर्वांना बोलावून स्पष्ट शब्दात सांगितलं, दरवाजा उघडा आहे. ज्यांना थांबायचं त्यांनी थांबा, बाकीच्यांनी निघून जावं”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button