Uddhav Thackeray | “विकली गेलेली माणसं शिवसैनिक म्हणायच्या लायकीची नाहीत”; उद्धव ठाकरेंचे ताशेरे

Uddhav Thackeray | मुंबई : आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर ताशेरे ओढण्याची एकही संधी सोडली नाही.

“मला अनेकवेळा विचारलं जातं, आमदार बंडखोरी करणार आहेत हे तुम्हाला कळलं नव्हतं का? तर मी त्यांना सांगायचो, हो कळलं होतं. तर काहीजण विचारतात मग तुम्ही त्यांना थांबवलं का नाही? मी त्यांना म्हटलं कशासाठी थांबवू मी या लोकांना?”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray Criticize Eknath Shinde Group

“जी माणसं विकली गेली आहेत त्यांना सोबत घेऊन मी ही लढाई कशी लढू? मला ती विकली गेलेली माणसं नकोत, मला लढाऊ माणसं हवीत. ही विकली गेलेली माणसं शिवसैनिक म्हणायच्या लायकीची नाहीत. मी सर्वांना बोलावून स्पष्ट शब्दात सांगितलं, दरवाजा उघडा आहे. ज्यांना थांबायचं त्यांनी थांबा, बाकीच्यांनी निघून जावं”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“आपण एकत्र आलो आहोत, त्यामुळे आपण सरकार स्थापन करू शकू. आपल्याला सरकार स्थापन करायचंच आहे. आमची सध्या न्यायालयीन लढाई सुरू आहे. माझा देवावर विश्वास आहे, माझ्या न्यायदेवतेवरदेखील तितकाच विश्वास आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

“लोकशाहीचे चार स्तंभ असतात. त्यापैकी तीन स्तंभांची विल्हेवाट या लोकांनी लावलीच आहे. या तीनमध्ये प्रसारमाध्यमं देखील आहेत. पूर्वी पत्रकारांच्या हातात ‘कलम’ असायचं, आजकालच्या पत्रकारांच्या हातत ‘कमल’ आहे. लोकाशाहीचे तीन स्तंभ कोलमडलेले असताना चौथ्या स्तंभाकडून आम्हाला आशा आहेत. हा चौथा स्तंभ म्हणजे सर्वोच्च न्यायालय. मला खात्री आहे न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी असली तरी ही न्यायदेवता लोकशाहीचं वस्त्रहरण होऊ देणार नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.