Share

Ajit Pawar | “कसब्यातला निकाल सत्ताधाऱ्यांना झोंबलाय त्यामुळं…”; अजित पवारांनी पुन्हा भाजपला डिवचलं

🕒 1 min readAjit Pawar | मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. या बैठकीला संबोधित करताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पावर (Ajit Pawar) यांनी कसबा निकालावरुन भाजपला पुन्हा एकदा डिवचलं आहे. Ajit Pawar Criticize State Government “महाविकास आघाडी एकत्र आल्यामुळे काय होऊ शकतं हे अलिकडच्या काळात … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. या बैठकीला संबोधित करताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पावर (Ajit Pawar) यांनी कसबा निकालावरुन भाजपला पुन्हा एकदा डिवचलं आहे.

Ajit Pawar Criticize State Government

“महाविकास आघाडी एकत्र आल्यामुळे काय होऊ शकतं हे अलिकडच्या काळात झालेल्या पाच विधान परिषदेच्या जागांच्या निकालावरून स्प्ष्ट झालं आहे. शिक्षक मतदारसंघात, पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीवरून आपल्याला समजलं आहे की, लोकांच्या मनात काय चाललं आहे. पदवीधरांनी मतपेटीद्वारे त्यांचा कल सांगितला. त्याचबरोर कसबा विधानसभेची पोटनिवडणूक झाली. गेल्या 28 वर्षांपासून कसब्याची जागा ही भाजपचा बालेकिल्ला आहे. पण महाविकास आघाडीने एकोप्याने निवडणूक लढल्यानंतर तिथे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

“कसब्याचा पराभव राज्यकर्त्यांना झोंबलाय”

“कसब्यातला हा पराभव राज्यकर्त्यांना आणि सध्याच्या राज्य सरकारमधल्या लोकांना झोंबलेला आहे. त्यामुळे ते आता खडबडून जागे झाले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे ११ हजार मतांनी जिंकले आहेत”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

“ठाकरेंचं सरकार पाडलं ते सामान्य माणसाला आवडलेलं नाही”

“कसब्याप्रमाणे चिंचवडची पोटनिवडणूकदेखील आपण जिंकू शकलो असतो. तिथंही आपल्याला यश मिळालं असतं. परंतु बंडखोरीमुळे मतांची विभागणी झाली. मतं विभागली गेली की काय होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार ज्या पद्धतीने पाडलं ते सामान्य माणसाला आवडलेलं नाही. राज्यातल्या जनतेला हे राजकारण पटलेलं नाही”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!