Uddhav Thackeray | “…म्हणून डोळे मिटून भाजपमध्ये गेलात का?” उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल

Uddhav Thackeray | मुंबई : राज्यात सत्तासंघर्षांची लढाई अद्यापही सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह धुनष्यबाण हे शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाकडून चांगलीच आक्रमकता दाखवण्यात आली. त्यानंतर सेनेचा हा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर ताशेरे ओढले आहेत. आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर सडकून टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

“महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो, असं म्हणतात. ती वेळ आज आलीये. ही लढाई फक्त शिवसेनेची नाही, ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे. मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायदेवता लोकशाहीचं वस्त्रहरण होऊ देणार नाही. सध्याच्या काळात सर्वोच्च न्यायालय हाच एकमेव आशेचा किरण आहे. कारण लोकशाहीच्या तीन खांबांची अवस्था काय झालीये. हे आपण पाहतोय”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray Criticize Shinde group 

“पत्रकारांच्या हातात ‘कलम’ असायला पाहिजे, आता ‘कमल’ आहे, असा टोला ठाकरेंनी लगावला. मोदी म्हणजे देश अशी व्याख्या आता भाजपवाले करु पाहतायेत. मग भारत माता की जय कशाला म्हणता? मोदी जिंदाबाद म्हणा ना…” अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलं आहे.

“…म्हणून डोळे मिटून भाजपमध्ये गेलात का?”

“त्यावेळीही सांगितलं, दरवाजा उघडा आहे, ज्यांना वाटतं त्यांनी थांबा, बाकीच्यांनी गेट आऊट… मला विकलेली माणसं नकोत. मला लढाऊ माणसं हवीत. याच माणसाने (एकनाथ शिंदे) नाटक केलं होतं. भाजप करत असलेला अन्याय मी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, असं सांगत कल्याणच्या सभेत राजीनामास्त्र काढलं होतं. मग आता काय झालं? तो अन्याय उघड्या डोळ्याने बघू शकत नाही म्हणून डोळे मिटून भाजपमध्ये गेलात का?” असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे.

“…पण पंचामृत कुणी लस्सीसारखं पीत नाही”

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यासारख्या अनुभव नसलेल्या माणसाला नेता म्हणून स्वीकारलं, हे त्यांचं मोठेपण आहे. आपल्याला ताकदीने निवडणुकांना सामोरे जायचंय. एकत्रित राहून आपली ताकद दाखवून देऊयात, अशा शब्दात त्यांनी मविआ कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकली. अर्थसंकल्पाचं नाव पंचामृत, पण पंचामृत कुणी लस्सीसारखं पीत नाही. थोडं थोडं देतात, पंचामृत द्यायचं आणि आपणच आपल्या डोक्यावर हात फिरवायचा”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button