Weather Update | नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे. कुठे अवकाळी पावसाने (Heavy rain) हजेरी लावली आहे तर कुठे उष्णतेची लाट (Heat wave) पसरली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून सातत्याने केले जात आहे. त्याचबरोबर या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अशात राज्यामध्ये पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता (Chance of unseasonal rain for the next five days)

देशातील बहुतांश भागांमध्ये 20 मार्चपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात (Weather Update) आला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीतील गहू, हरभरा, मक्का इत्यादी पिकांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. या नुकसानाचे लवकरात लवकर पंचनामे तयार करण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

आजपासून म्हणजेच 16 ते 20 मार्च या कालावधीमध्ये पूर्व भारत, वायव्य भारत आणि पश्चिम हिमालयीन प्रदेशात हलक्यातील मध्यम स्वरूपाच्या पावसासोबतच गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. तर पुढील 10 दिवसांमध्ये मध्य, उत्तर आणि पश्चिम भागात मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होऊन उत्पादनावर देखील परिणाम होणार आहे.

दरम्यान, राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. कुठे ढगाळ वातावरण आहे तर कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदलत्या हवामानाचा (Weather Update) फटका शेतीतील पिकांना बसत आहे. या वातावरणाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचा संकट घोंगावत आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.