Narendra Modi | “जगात कुठेही भारतीय अडकला तर झोप येत नाही” : नरेंद्र मोदी

Narendra Modi | नवी दिल्ली : सध्या सुदानमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारात अनेक भारतीय नागरिक अडकलेले होते. त्यांना भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ (Operation Kaveri) असं नाव देत सुखरुप परत आणलं आहे. यामध्ये भारतीय वायुसेनेने प्रमुख भूमिका पार पाडली. तर गेल्या चार दिवसांपूर्वी जे नागरिक आपल्या मायदेशी ( भारतात) परतले आहेत त्यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी ( Narendra Modi ) संवाद साधला आहे.

जगात कुठेही भारतीय अडकला तर  झोप येत नाही : नरेंद्र मोदी 

तर सुदानमधून कर्नाटकमध्ये परत आलेल्या नाागरिकांशी मोदींनी संवाद साधत म्हटलं की, आतापर्यंत भारतीयांनसाठी सरकारने अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. यामध्ये ‘ऑपरेशन गंगा ‘ असेल किंवा सध्याच ‘ऑपरेशन कावेरी’ असेल याच्या माध्यमातून भारतीयांना आपल्या मायदेशी सुखरूप आणण्याचं काम सरकार करत आहे. यासाठी भारतीय तिन्ही दलाची प्रमुख भूमिका आहे. तर ऑपरेशन कावेरीच्या (Opration Kaveri) माध्यमातून हक्की पिक्की जमातीच्या 210 जणांना सुदानमधून कर्नाटकच्या शिवमोग्गामध्ये आणलं आहे. ही आनंदाची बाब आहे. “जर जगात कुठेही नागरिक अडकला तर  झोप येत नाही” असं संवादादरम्यान मोदीनी म्हटलं आहे.

(If an Indian is stuck anywhere in the world, he cannot sleep: Narendra Modi )

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी भारतात परतलेल्या नागरिकांनी त्या ठिकाणी कोण कोणत्या गोष्टीचा सामना केला. याबाबदत देखील चौकशी करण्यात आली. तर संवादादरम्यान नागरिकांनी देखील सरकारचे आभार मानत म्हटलं की, त्या ठिकाणच्या भारतीय दूतावासानी आणि सरकारने आमची हाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेतली हे सर्व पंतप्रधान मोदींमुळे शक्य झालं आहे. अशा शब्दांत भावना व्यक्त करत मोदींचे आभार देखील मानले. याचप्रमाणे ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून
सुदानमधून 3,862 नागरिकांना सुखरुप मायदेशात आणलं असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री डॉ. एस.जयशंकर यांना दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला मोदींवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींची अनेक ऑपरेशन राबवत आहेत. आधी ऑपरेशन गंगा आता कर्नाटक निवडणूक होणार तर ऑपरेशन कावेरी राबवण्यात आलं. तर आगामी निवडणुकासाठी ऑपरेशन गोदावरी होणार का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय.

महत्वाच्या बातम्या –

Back to top button