Uddhav Thackeray | महाडमधील जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर सडकून टीका !

Uddhav Thackeray | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोकणातील रिफायनरी प्रकल्पनावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तर रत्नागिरी येथील बारसु या ठिकाणी स्थानिकांनी आंदोलन करत विरोध केला आहे. आज ( 6 मे ) उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray) बारसु या ठिकाणी जाणार होते म्हणून सकाळी केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरेंना इशारा दिला होता. तर त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची महाड इथं जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे (What did Uddhav Thackeray say)

महाडमधील सभेतून उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. ठाकरे म्हणाले, आपल्याकडं अशी एक आणि एकावर दोन फ्री असे काहीजण आहेत. त्याची आता एवढी पंचायत झाली आहे की, त्यांना काय सांभाळावं हे कळत नाही. उठसूट काहीही बोलतात तर त्याना बोलू द्या. त्यामुळं भाजपने सुक्ष्म माणसावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. दररोज येऊन काहीही बोलण्यासाठी. याच्यावर त्यांचं पोट भरत. अशा शब्दांत नारायण राणेंनवर टीका केली आहे. तसचं राणें म्हणतात, कोकणातील लोक ठाकरेंचे नातेवाईक आहेत. तर त्यांना माझं सांगणं आहे की, हो ते सर्वजण माझ्या कुटुंबातील आहेत. म्हणून मी माझ्या या नातेवाईकांसाठी लढत आहे, पण तुम्ही उपऱ्यांसाठी लढत आहात. ज्याचं काहीही देणंघेणं नाही. तुम्ही माझा महाराष्ट्र मारायला निघाला आहात, अशा शब्दांत ठाकरेंनी राणेंवर देखील हल्लाबोल केला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सरकारवर देखील निशाणा साधला . त्यांनी बारसु प्रकल्पनावरून शिंदेंना चांगलंच सुनावलं . हे नागोबा तिथं जाऊन बसलेत त्यांनी बरसुला प्रकल्प का नेला? तुम्ही पत्र लिहलं याबाबत सत्य सर्वांना सांगा . सत्य का लपवल जातय? असे प्रश्न उपस्थित करून खुलासा देखील केला. तसचं ज्यांनी भाजपशी जाऊन हातमिळवणी केली त्यांनी म्हटलं होत की, आम्ही शिवसेना सोडली कारण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे. हिंदुत्व काय आहे ते तुम्ही समजून घ्या. जे आम्हाला शिवसेनाप्रमुख आणि प्रबोधनकारांनी हिंदुत्व सांगितलं आहे. आमचं हिंदुत्व हे शेंडी-जाणव्याचं हिंदुत्व नाही. जे तुम्ही सांगता ना हिंदुत्व तर मला सांगा भाजपकडे कुठलं हिंदुत्व आहे, गोमुत्रधारी हिंदुत्व आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. याचप्रमाणे

Back to top button