Raj Thackeray – राज ठाकरेंनी सांगितले शरद पवारांचे राजीनामा मागे घेण्याचे खरं कारण

Raj Thackeray VS Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी ३ मे रोजी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्याला पक्षातील कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून विरोध झाला. त्यानंतर शरद पवार यांनी काल (५ मे) त्यांचा राजीनामा मागे घेतला. शरद पवारांनी राजरीनामा मागे घेतल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Raj Thackeray Says Sharad Pawar Withdrew Resignation Due To Ajit Pawar

राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले, अजित पवार ( Ajit Pawar ) त्या दिवशी जसं वागत होते, ते पाहून शरद पवारांनी त्यांचा निर्णय बदलला असावा. राजीनामा दिला त्या दिवशी अजित पवार कार्यकर्त्यांशी कसे वागले ते आपण पाहिलं. ए तू गप्प बस, ए तू शांत बस, कार्यकर्त्यांच्या हातातला माईक घे, असं सगळं त्यांचं सुरू होतं. हे सगळं पवार साहेबांच्या डोळ्यादेखत सुरू होतं. हे सर्व पाहताना पवार साहेबांच्या मनात आलं असणार. अरे आत्ताच तर मी राजीनामा दिलाय आणि हा माणूस ( Ajit Pawar ) असा वागतोय. खरंच जर राजीनामा देऊन टाकला तर हा माणूस उद्या मला पण म्हणेल ए गप्प बस. त्या भितीपोटी, या भितीपाई त्यांनी राजीनामा मागे घेतला. जेणेकरून नंतर कसलीही भानगड नको.

मुंबईचा महापौर बंगला काय लोकांना विचारुन ढापलात का?

राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी सभेच्या भाषणातून उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारत म्हटलं की, पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष बारसूला येऊन गेले. इकडे येऊन काय म्हणाले? जी लोकांची भावना आहे ती आमची भावना आहे. मग मुंबईचा महापौर बंगला हा काय लोकांना विचारुन ढापलात का? असा थेट प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना उद्देशून विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.