Girish Mahajan | “मला फसवण्याचा कट, माझ्या गाडीत गांजा”; महाजनांनी सांगितलं ‘ते’ पेनड्राईव्ह प्रकरण

Girish Mahajan | जळगाव : विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांना मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या वादा प्रकरणी छापेमारी प्रकरणात गुन्ह्या दाखल करुन शहर पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांना आज जळगाव जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. या प्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

काय आहे हे पेनड्राईव्ह प्रकरण?

यावेळी गिरीश महाजन यांनी पेनड्राईव्हचा देखील उल्लेख केला आहे. गिरीश महाजन यांनी उल्लेख केलेले पेनड्राईव्ह प्रकरण तेच आहे जे गेल्यावर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान मांडलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे थेट पेन्ड्राईव्ह जमा करत खळबळ उडवून दिली होती. या पेन्ड्राईव्हमध्ये विशेष सरकारी वकील यांचं संभाषण होतं. प्रवीण चव्हाण यांनी गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी प्लॅन आखल्याचा दावा त्यांनी केला होता. या प्रकरणी प्रवीण चव्हाण यांना काल पोलिसांनी अटक केली आहे.

“मला फसवण्याचा कट, माझ्या गाडीत गांजा”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुद्दा उपस्थित केला. मला फसवण्याचा कट होता. माझ्या गाडीत गांजा टाका, मेडिकलमध्ये काही काढा, असं प्रविण चव्हाण बोलत होते. पेनड्राईव्ह आहे”, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे.

“माझ्यावर मोक्का लावला, मानसिक त्रास झालाय”

“माझ्यावर मोक्का लावला. मला मानसिक त्रास झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेंच्या मतदारसंघात केस दाखल केली. सीबीआय चौकशी सुरू आहे. जे प्लानर आहेत, त्यांची नावे समोर येतील. चार पाच लोकांना बळजबरी घालायचं. प्रविण चव्हाण वारंवार बोलत आहेत, त्यांचा हात आहे. प्रविण चव्हाण यांना अटक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होईल. ते खडसेंचं नाव घेत होते. सगळं समोर येईल, सत्य समोर येईल, मला न्याय हवा”, असंही गिरीश महाजन म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-