Ajit Pawar | माझा वाढदिवस साजरा करू नका; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar | मुंबई: काल (19 जुलै) रात्री रायगड जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी साजरा केला जातो. त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करतात.

Ajit Pawar has decided not to celebrate his birthday

मात्र, यावर्षी अजित पवारांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. इर्शाळवाडी येथे घडलेल्या घटनेमुळे अजित पवारांनी हा निर्णय घेतला आहे.

होर्डिंग, जाहिराती, पुष्पगुच्छ यांच्यावर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडीच्या पुनरुभारणीसाठी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन अजित पवार यांनी सर्वांना केलं आहे.

दरम्यान, काल रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास इर्शाळवाडीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत 50 ते 60 घरांची ही वस्ती अख्खी मातीच्या ढिगार्‍याखाली गेली आहे.

या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत करण्याची घोषणा अजित पवारांनी (Ajit Pawar) केली आहे. त्याचबरोबर दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांवर सरकारी खर्चनं उपचार केले जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आहे.

या दुर्घटनेनंतर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज्य सरकारवर (Ajit Pawar) टीका केली आहे. मी गृहमंत्री असताना घर बांधून दिली होती, तुम्ही देखील देणार का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला होता.

“तुम्ही मंत्री नाही म्हणून काम होणार नाही असं काही नाही”, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर दिली आहे.

महत्वाच्या बातम्या