Ajit Pawar | जखमींवर सरकारी खर्चानं उपचार तर मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar | रायगड: रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एक दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड (Irshalgad Landslide) कोसळली आहे. या दुर्घटनेत 50 ते 60 घरांची ही वस्ती अख्खी मातीच्या ढिगार्‍याखाली गेली आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

The people injured in the Irshalwadi Landslide will be treated at government expense

रायगडमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सकाळीच मंत्रालयात जाऊन आपत्कालीन नियंत्रण कक्षाची सूत्रे हातात घेतली आहे.

त्यानंतर त्यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या लोकांवर सरकारी खर्चानं उपचार केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यामध्ये घडलेल्या या घटनेवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी खंत व्यक्त केली आहे. ट्विट करत ते म्हणाले, “रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शाळवाडी परिसरात गावावर दरड कोसळून झालेली दुर्घटना मन पिळवटून टाकणारी आहे. दरडीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती आहे.

बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. परंतु पाऊस सतत पडत असल्यानं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.

जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल अशी प्रार्थना करतो. या दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”

19 जुलै रोजी रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास ही दुर्घटना घडली (Ajit Pawar) आहे. वस्तीतील लोक झोपेत असताना त्यांच्यावर हे मोठं संकट कोसळलं आहे. दुर्घटनेनंतर वस्तीतील 50 ते 60 घर अख्खी मातीच्या ढिगार्‍याखाली गेली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.