मुंबई – संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh murder case) मुख्य आरोपी वाल्मिक कराडला ( Walmik Karad ) वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाला दोन महिने उलटून गेले तरीही अद्याप सगळे आरोपी अटकेत नाहीत. विशेष म्हणजे, वाल्मिक कराडला जेलात VIP ट्रीटमेंट मिळते, महाराष्ट्राच्या सरकारच्या असल्या षंड भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) सपशेल अपयशी ठरले आहेत.
धनंजय मुंडेचा ( Dhananjay Munde ) राजीनामा नको, त्यांची हकालपट्टी करा अशी मागणी होत आहे. तसेच महाराष्ट्रात कायदा- सुव्यवस्थेचा अनागोंदी प्रकार बघता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. काल जे फोटो व्हयरल झालेत ते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी महिना भरापूर्वीच बघितले तरीही मुंडेचा राजीनामा घेतला नसल्याचा आरोप विरोधक करत आहे.
Devendra Fadnavis failed as Home Minister
राज्यातील विरोधक आणि संतोष देशमुख यांचे समर्थक यावरून आक्रमक झाले असून, त्यांनी थेट सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात पुरेशी कारवाई होत नसल्याने, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरत असल्याची टीका करण्यात येत आहे.
फडणवीस यांनी या प्रकरणात कारवाई का करत नाही? सगळ्या आरोपींना अटक का होत नाही? अशा अनेक प्रश्नांनी सरकारला घेरले जात आहे. दोन महिने उलटूनही तपास मंदगतीने सुरू असल्याने, सरकारवर दबाव वाढत आहे. आता विरोधक आणि जनतेच्या दबावानंतर सरकार काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या