Share

“आरोपींना गोळ्या घालून मारलं तरच…”; Dhananjay Deshmukh यांची मोठी मागणी

As soon as the photos of Santosh Deshmukh murder came out, his brother Dhananjay Deshmukh reacted angrily and made a big demand.

by MHD

Published On: 

Dhananjay Deshmukh demands Shoot accused in Santosh Deshmukh murder case

Dhananjay Deshmukh । संतोष देशमुख हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. कालच त्यांच्या हत्येचे फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहून संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळत आहे. सध्या बीडमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत.

आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “आरोपी कुणाच्या जीवावर दहशत माजवत होते. त्यावेळी असणाऱ्या पोलिसांना सर्व माहिती असतानाही त्यांनी काहीच केले नाही,” असा आरोप देशमुख यांनी केला.

“आरोपींना सांभाळणारा आणि त्यांना वाचवणारा माणूस कोण आहे? हे सगळ्या राज्याला माहिती आहे. ही परिस्थिती आमच्यावर का आली? याचं उत्तर राज्य सरकारने द्यावे. जरी सर्व मंत्रिमंडळ जरी बरखास्त केलं तरी त्याचा आम्हाला फायदा काय? आरोपींना गोळ्या घालून मारले तरच आम्ही त्यावर बोलू,” अशी संतप्त प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे.

“माझ्या भावाला ज्यांनी मारले, आरोपींचे समर्थन करणाऱ्यांना नियती कधीच माफ करणार नाही. माझा नियतीवर संपूर्ण विश्वास आहे. यांचा काळाबाजार उठणार आहे. मला दुःख व्यक्त करण्याचा अधिकार सुद्धा या व्यक्तींनी ठेवला नाही,” अशा भावना धनंजय देशमुखांनी व्यक्त केल्या.

Dhananjay Deshmukh demand in Santosh Deshmukh murder case

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या व्हायरल झालेल्या फोटोवरून धनंजय देशमुखांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे आज मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आपला राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही