Dhananjay Munde । केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे (Santosh Deshmukh murder case) फोटो समोर आले असून यामुळे राज्यभरात आरोपींविरोधात संतापाची लाट उसळत आहे. याच कारणास्तव आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
तसेच मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला असल्याची माहिती समोर आली आहे. आज विधीमंडळ सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच मुंडे राजीनामा देऊ शकतात.
काल रात्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात एक दीड ते दोन तास महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राजीनामा द्यावा लागेल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
वाल्मिक कराड (Walmik Karad) हा संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असून तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे विरोधक सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. पण राज्य सरकारने अजूनही त्यांचा राजीनामा घेतला नाही.
Does Dhananjay Munde resign today?
पण काल संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे हे आज आपल्या पदाचा राजीनामा देतात का? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :