Weight Loss | वजन कमी करण्यासाठी नाश्त्याचे वेळी करा ‘या’ ज्यूसचे सेवन

Weight Loss | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वाढते वजन ही प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीची समस्या झाली आहे. कारण अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयीमुळे बहुतांश लोक वजन वाढण्याच्या समस्याला झुंज देत आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. मात्र, ही औषधे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये काही ज्यूसचा समावेश करू शकतात. हे ज्यूस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर या पेयाचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहू शकते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये पुढील ज्यूसचा समावेश करू शकतात.

बीट ज्यूस (Beet juice-For Weight Loss)

बीट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बीटाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रणात राहते. त्याचबरोबर बीटाचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि पचन संस्था देखील निरोगी राहते. तुम्ही सकाळी नाष्ट्यामध्ये बीटाच्या रसाचे सेवन करू शकतात. सकाळी याचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहू शकते.

गाजराचा ज्यूस (Carrot juice-For Weight Loss)

गाजर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, कॅल्शियम, फायबर, आणि विटामिन सी आढळून येते. गाजराचे नियमित सेवन केल्याने दृष्टी वाढते आणि रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. त्याचबरोबर सकाळी नाश्त्याच्या वेळी गाजराचा रस प्यायल्याने पचनक्रिया निरोगी राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

पालकाचा ज्यूस (Spinach juice-For Weight Loss)

पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, फायबर, पोटॅशियम, आणि विटामिन सी आढळून येते. पालकाचा ज्यूस प्यायल्याने डोळे दीर्घकाळ निरोगी राहू शकतात आणि पोटही निरोगी राहू शकते. त्याचबरोबर सकाळी नाश्त्याच्या वेळी पालकाचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर याच्या सेवनाने बद्धकोष्टता, अपचन, गॅस यासारख्या समस्या देखील सहज दूर होतात.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही नाश्त्याच्या वेळी वरील ज्यूस सेवन करू शकतात. त्याचबरोबर खालील हिरव्या फळांचे सेवन केल्याने आरोग्याला फायदे मिळू शकतात.

किवी (Kiwi-Green Fruits Benefits)

कीवी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई, विटामिन सी, पोटॅशियम, अँटिऑक्सिडेंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आरोग्य तज्ञ किवी खाण्याचा सल्ला देतात. त्याचबरोबर डायबिटीसच्या रुग्णांसाठी देखील किवी खूप फायदेशीर ठरू शकते.

पेरू (Guava-Green Fruits Benefits)

पेरूमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आढळून येते, जे स्नायू मजबूत करण्यास मदत करते. त्याचबरोबर पेरूचे सेवन केल्याने तणावही कमी होतो. पेरूमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर आढळून येते, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर पेरू खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहू शकते. या हिरव्या फळांमध्ये विटामिन ए, विटामिन सी, झिंक, कॉपर यासारखे पोषक गुणधर्म आढळून येतात.

आवळा (Amla-Green Fruits Benefits)

आवळ्यामध्ये विटामिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयरन, कार्बोहायड्रेट, फायबर इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे आवळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहते. त्याचबरोबर आवळा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारू शकते. मोसमी आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी देखील तुम्ही आवळ्याचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या