Eknath Shinde | पत्रकार वारिशे हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde | कोल्हापूर : कोकणातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. या प्रकरणावरुन सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कणेरी मठावर होत असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावर भाष्य केले आहे.

एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

पत्रकार जीव धोक्यात घालून काम करत असतात. हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. त्यामुळे पत्रकार वारिशे यांच्यावर हल्ला करणाऱ्याला कोणत्याही प्रकारे पाठिशी घातलं जाणार नाही. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला कायद्यानुसार शिक्षा होणारच आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

“दोषींना पाठिशी घालू नका”

“मला राजकीय वक्तव्याला उत्तर द्यायचे नाही, पण जे दोषी असतील त्यांना पाठीशी घालू नका”, असं म्हणत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

विनायक राऊत काय म्हणाले?

“रिफायनरी आणि जमीन दलालांच्या विरोधात मागच्या अनेक वर्षापासून आवाज उठवणारे शशिकांत वारीशे यांचा घातपात झाला आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता, न्यायासाठी लढणारे म्हणून वारिशे यांचा उल्लेख होता. वारिशेंच्या हत्येचा पोलिसांनी योग्य तो तपास करावा,” अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

“आंबेरकर राणेंबरोबर, त्यांच्या चिथावणीमुळेच पत्रकाराच्या हत्येचं षडयंत्र”-(Vinayak Raut)

“सिंधुदुर्गमध्ये जिल्हा नियोजनची बैठक झाली होती. भाजपचे जबाबदार केंद्रीय नेते यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीत मालवचं सी-वर्ल्ड आणि रिफायनरी याच्याविरोधात येणाऱ्यांची गय करू नका, प्रसंगी पोलिसांचा वापर करून प्रकल्प राबवा, असं वक्तव्य केलं होतं. हा पंढरीनाथ गुंडगिरी करणारा आंबेरकर नारायण राणे किंवा निलेश राणेंबरोबर असतो. त्यांच्या चिथावणीमुळे वारीशेसारख्या पत्रकाराची हत्या करण्याचं षडयंत्र आंबेकरने आखलं,” असा गंभीर आरोप विनायक राऊतांनी नारायण राणेंवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button